पुणे

बारामतीत नीचांकी मतदानाचे कारण काय?

CD

सोमेश्वरनगर, ता. २७ : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत निचांकी मतदान झाल्याने नेमके काय कमी पडले? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. या ताणतणावातही तालुक्यातील नऊ गावांनी ७० टक्केपेक्षा अधिक तर ४७ गावांनी ६० ते ७० टक्के मतदान केले आहे ही समाधानाची बाब आहे. तालुक्यात खंडोबाचीवाडी या छोट्या ग्रामपंचायतीने मोठ्या काटेवाडीलाही मागे टाकत ७८.३८ टक्के इतके सर्वाधिक मतदान केले तर मुढाळे गावात ४३.२४ टक्के इतके सर्वांत कमी मतदान झाले आहे.
बारामती विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर किरकोळ उमेदवार उभे होते. त्यामुळे निकालाबाबत नव्हे तर मताधिक्याचा किती विक्रम नोंदविला जाणार यासाठी कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू होते. उत्तरप्रदेशातील शाहीबाबाद विधानसभा मतदारसंघातून सुनीलकुमार शर्मा यांनी २ लाख १४ हजार ८३५ इतक्या देशात सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम नोंदविलेला आहे. हा विक्रम मागे टाकण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी चंग बांधला होता. यावर तालुक्यात ५८.२३ टक्के इतके म्हणजे २ लाख २३ हजार ९८८ मतदान झाले आहे. मतदान काठावर आल्याने विरोधी उमेदवार किती मतदान घेणार, ''नोटा'' किती पडणार आणि राष्ट्रीय विक्रम मोडला जाणार का याची मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे. अपेक्षेपेक्षा तालुक्यात खूप कमी मतदान झाले. यात उन्हाच्या तीव्रतेचे आणि अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे सावट आहे. याशिवाय कार्यकर्ते, नेते नेमके कुठे कमी पडले याचीही चर्चा तालुक्यात सुरू आहे.

जिरायती भागात टक्का घटला
बारामती शहरात तालुक्याच्या सरासरीपेक्षा कमी म्हणजे ५४.१० टक्के तर माळेगाव नगरपंचायतीत सरासरीइतकेच ५८.२३ टक्के मतदान झाले. तालुक्याच्या जिराईत पट्ट्यात मतदानाचा टक्का जास्त घटल्याचे दिसते. खंडोबाचीवाडी, कन्हेरी, मासाळवाडी, काटेवाडी, वाणेवाडी, पिंपळी, चांदगुडेवाडी, करंजेपूल, कोळोली या गावांनी ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान नोंदविले आहे. तर मुढाळे, आंबी बुद्रुक, मोढवे, शिर्सुफळ, नारोळी, वढाणे, पारवडी, जोगवडी, भोंडवेवाडी, खराडेवाडी, तरडोली, लोणी-भापकर या गावांचा टक्का ५० टक्क्यांच्या आत अडकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

Pune Charity Commissioner : पारदर्शक न्यायदान हाच न्यायव्यवस्थेचा कणा : पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांचा कार्यभार स्वीकारताना निर्धार

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Mohol Crime : पैशाच्या वादातून एकाचा खून, एक गंभीर जखमी; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

IPL 2026 Point Table: दक्षिणेचा 'दिल्लीवर' कब्जा! RCB चा मोठा विजय, दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारा DC आज ७५ धावांत तंबूत

SCROLL FOR NEXT