पुणे

बाल मृत्यूप्रकरणाबाबत समिती करणार चौकशी

CD

शेटफळगढे, ता. १५ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीदरम्यान झालेल्या बाल मृत्यूप्रकरणी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या पथकाने चौकशी समितीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला. तसेच, येथील कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे आश्वासनही ग्रामस्थांना दिले.
शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील आरोग्य केंद्रात गर्भवती महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. दुर्दैवाने प्रसूतीनंतर बाळ मृत पावले. यावेळी येथे वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे आणि आरोग्य सहायिकेने प्रसूती केल्यामुळे बाळ दगावल्याचा आरोप संबंधित पालकांनी केला होता. २५ एप्रिलला सदरची घटना घडूनही कोणत्याही प्रकारची कारवाई आरोग्य विभागाने केली नव्हती. त्यामुळे याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकांना न्याय देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांच्याकडे केली होती.
या तक्रारीची दखल घेत आरोग्य विभागाने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या पथकाने सोमवारी शेटफळगढे येथे भेट दिली. या वेळी वाघ यांनी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून माहिती घेतली. तसेच, येथील प्राथमिक केंद्रात तातडीने बायोमेट्रिक बसविण्याच्या सूचना केल्या. तसेच, प्रसूतीदरम्यान झालेल्या बालमृत्यूची चौकशी करण्यासाठी समिती नेमून त्याचा अहवाल सादर केला जाणार असल्याचे सांगितले. तर, दोषीविरोधात खात्याअंतर्गत कारवाई करण्याचे संकेत दिले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी हजर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT