पुणे

लाकडी निंबोडी योजनेची जनसुनावणी पुढे ढकलली

CD

शेटफळगढे, ता. ३ : लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसंदर्भात असलेली पर्यावरणीय जनसुनावणी निवडणूक आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
बारामती आणि इंदापूर तालुक्यातील १७ गावच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उजनी जलाशयातून उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी देऊन शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जाणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने निविदाही काढली आहे. या होणाऱ्या प्रकल्पाच्या अनुषंगाने लाकडी (ता. इंदापूर) येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी ३ नोव्हेंबर रोजी येथील प्राथमिक शाळेत सुनावणी ठेवली होती. मात्र, लाकडी येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात संवेदनशील वातावरण आहे. त्यामुळे ५ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर सुनावणी घ्यावी, अशा स्वरूपाचा अहवाल तहसीलदारांनी २ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. तशा संबंधित विभागाला सूचना निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी एका आदेशाने दिल्या आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा नव्याने सुनावणी घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT