पुणे

खडकवासला कालव्याच्या पाण्यामुळे आशा पल्लवीत

CD

शेटफळगढे, ता २८ : खडकवासला कालव्याचे शेतीसाठी रब्बी हंगामातील पहिल्या आवर्तनाला मुहूर्त मिळाला आहे. धरणातून शेतीसाठी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे पिके जगवण्याची धडपड सुरू असलेल्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पिकांना पाणी मिळणार असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

इंदापूर तालुक्यात अडीच महिन्याहून अधिक कालावधीपासून कालव्याला पाणी नाही आणि पाऊस पडला नाही. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. तालुक्यातील तलावात पाणी सोडण्याच्या वेळेस धरण क्षेत्रातील पाऊस बंद झाल्याने कालवा बंद करण्यात आला. बारामती आणि दौंड तालुक्यातील कालव्याद्वारे तलावात पाणी सोडले होते. मात्र, तालुक्यातील एकाही तलावात पाणी न सोडताच पावसाळ्यातील आवर्तन बंद केले होते. आता कालवा सल्लागार समितीची बैठक झाल्याशिवाय इंदापूरच्या शेतीला पाणी नाही, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत २५ नोव्हेंबरपासून शेतीला पाणी दिले जाणार असल्याच्या माहिती पुढे आली होती. अखेर २७ नोव्हेंबरला खडकवासला धरणातून कालव्याला पाणी सोडले आहे.
खडकवासला कालव्याला प्रशासनाने पाणी सोडल्यामुळे आता पिके जगविण्यास मदत होईल, असे शेतकरी विजय काळे यांनी सांगितले.

इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन खडकवासला धरणातून २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता सोडण्यात आले आहे.
- मोहन भादने, उपअभियंता खडकवासला धरण प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : चार सामने अन् Orange Cap साठी ७ दावेदार! विराटचा शेवटचा क्रमांक, Vaibhav Sooryavanshi पण आहे पुढे, टॉपर कोण?

डोळ्यात संताप अन् लेकरासाठीची तगमग; प्रार्थना बेहेरेच्या 'मर्दिनी'चा टीझर प्रदर्शित; दिसणार अभिनेत्रीचा दमदार अंदाज

कला, नृत्य आणि विज्ञानाचा संगम... मुंबईत ओपन सायन्स पार्क साकारतंय! विज्ञान शिकणं होणार आणखी रंजक

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Nautapa 2026: नवतापा म्हणजे काय? वर्षातील सर्वात गरम दिवसांमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT