शेटफळगढे, ता. ३० : शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील शेतकरी कुटुंबातील पूनम तुळशीदास झगडे हिने उपशिक्षणाधिकारी पदाला गवसणी घातल्यानंतर आता पोलिस उपअधीक्षक होण्याचा बहुमान पटकाविला आहे. तिच्या या कामगिरीसाठी तिचे पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.
एका सामान्य शेतकरी कुटुंबातील पूनमने ग्रामीण भागात आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर बी.ई. मेकॅनिकलची पदवी घेतल्यानंतर नाशिकमध्ये एक वर्ष नोकरी केली. परंतु नोकरीत मन लागेना म्हणून तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी सुरू केली. २०२१च्या परीक्षेमध्ये तिने घवघवीत यश संपादन करून उपशिक्षणाधिकारी या पदाला गवसणी घातली. मात्र एवढ्यावरच न थांबता तिने २०२२मध्ये पुन्हा एकदा परिक्षा दिली. या परिक्षेचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये तिची निवड पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. ही परिक्षा देताना पूनमने इयत्ता पहिली कोणत्याही खासगी शिकवणीची मदत न घेता स्वयंअध्ययन करून जिद्द व कष्टाच्या जोरावर आणि आई-वडिलांच्या आशीर्वाद व सहकार्यामुळे हे स्वप्न साकार केले. तिच्या या यशात आई रोहिणी झगडे याचा मोलाचा वाटा असल्याचे पूनमने सांगितले. पुनमची पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाल्याचे कळताच शेटफळगढे ग्रामस्थांनी तिची घोड्यावरून मिरवणूक काढली. ग्रामस्थांतर्फे माजी सरपंच बापूराव वाबळे, माजी उपसरपंच अण्णासो शिरसाट व छत्रपती कारखान्याचे माजी संचालक अशोक वाबळे यांनी तिचा सन्मान केला.
शेटफळगढे (ता. इंदापूर) : पुनम झगडे हिचा सन्मान करताना ग्रामस्थ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.