पुणे

भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी

CD

शेटफळगढे, ता ४ : शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या समोरून चोरी झालेला ट्रॅक्टर धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथून भिगवण पोलिसांनी हस्तगत केला.

बारामती अॅग्रो या कारखान्याला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कारखान्याच्या वजन काटा समोरून चोरीस गेला. अक्षय अनिल राऊत (वय २५, रा. केत्तूर, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या मालकीचा महिंद्रा कंपनीचा निओ ट्रॅक्टर नंबर. एम. एच. ४५/ए. क्यु. ३२०७ किंमत रुपये पाच लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर होता. राऊत यांच्या फिर्यादीवरून भिगवण पोलिस ठाणे, गुन्हा. रजि. नंबर. ७४/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ च कलम. ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याची माहिती मिळताच गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून ऊस वाहतूकदार शेतकरी यांना भिगवण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी आधार देऊन तत्काळ तपास पथक तयार करून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर व अज्ञात चोराचा शोध घेणे यासाठी मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना देवून तपास पथक रवाना केले. या गुन्ह्यातील अज्ञात चोरटा यांचा शोध घेत असताना विविध ठिकाणचे जवळपास १०० सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीने माहिती काढून अज्ञात ट्रॅक्टर चोर सोमनाथ भारत शिंदे (वय२३, रा. शिंदेवस्ती, बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे यास नळदुर्ग, जि. धाराशिव) या ठिकाणाहून ३ मार्च रोजी ताब्यात घेऊन त्यांचेकडे सखोल विचारपूस केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली. गुन्ह्यातील चोरीस गेलेला ट्रॅक्टर भिगवन पोलिसांनी हस्तगत केला


सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देखमुख, बारामती विभागाचे अपर पोलिस गणेश बिराजदार, बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे, भिगवण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलिस अंमलदार महेश उगले, संतोष मखरे, सचिन पवार, प्रमोद गलांडे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अंमलदार महेश उगले, व पोलिस हवालदार हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT