पुणे

शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी साकडे

CD

शेटफळगढे, ता १८ : इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांना साकडे घातले आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला कुल यांनी दिले.

खडकवासला कालव्यावर दौंड आणि इंदापूर तालुक्यातील हजारो एकर शेती अवलंबून आहे. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे खडकवासला धरणातून मिळणारे पाणी कमी होत आहे. परिणामी इंदापुरातील शेतीला सर्वाधिक फटका बसत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने पाच टीएमसी पाणी उजनी जलाशयातून उपसा सिंचन योजनेद्वारे उचलून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या योजनेला सोलापूरकरांनी विरोध केल्यानंतर तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याची उपसा सिंचन योजना रद्द केली आहे. ती योजना पुन्हा मंजूर करून खडकवासला कालव्यावरील ताण कमी करण्याची मागणी लोकप्रतिनिधी सह शेतकरी वर्ग ही करत आहे.


शासनाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष
इंदापूर तालुक्यातील उपसा सिंचन योजना केल्यास पुणे शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेतेमंडळी या योजनेसाठी आग्रही असल्याने तालुक्यासह पुणे शहराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांसह पुणे शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे.


इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने खडकवासला कालव्यावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उजनी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून येथे कालव्यात पाणी टाकून शेती ओलिताखाली आणणे महत्त्वाचे आहे. इंदापूर तालुक्यात बरोबरच दौंड तालुका आणि शहराच्या पुणे शहराच्या दृष्टीने ही योजना होणे महत्त्वाचे आहे. ही बाब आम्ही दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या निदर्शनास आणून देण्याचे काम केले आहे. प्रत्यक्ष भेटून संबंधित योजने संदर्भात कागदपत्र दिली आहेत.
- रमेश खारतोडे, माजी जिल्हा अध्यक्ष भारतीय किसान मोर्चा

01462

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Tope: शरद पवार गटाला धक्का? राजेश टोपे खरंच भाजपमध्ये जाणार? अखेर स्वतः टोपेंनीच दिलं स्पष्ट उत्तर!

Konkan Railway: ‘वंदे भारत’, ‘तेजस’च्या फेऱ्यांत १५ जूनपासून कपात; कोकण रेल्वे मार्गावर मॉन्सून वेळापत्रक, गाड्यांच्या वेळाही बदलणार

Uttarakhand Jewellery: मॉडर्न नववधूंची पहिली पसंती! हिमालयाच्या कुशीतील 'या' ५ पारंपरिक दागिन्यांपुढे सोन्याचे हारही फिके!

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT