पुणे

शेटफळगढे, निरगुडेत घरांची पडझड

CD

शेटफळगढे,ता.२५: इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेटफळगढे, निरगुडे परिसरात सलग तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. सत्तर वर्षाच्या इतिहासात मे महिन्यात ओढ्या नाल्यांना पहिल्यांदाच पूर आला आहे. तसेच अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.
मागील तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. शेतीतून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत आहे. शेटफळगढे गावातील ओढ्यालगत असलेल्या पंधरा ते वीस घरात पाणी शिरले आहे.
सिद्धेश्वर निंबोडी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. तर काही घरांची पडझड झाली आहे. निरगुडे येथील मुख्य रस्ता जलमय झाल्याने रस्त्यालाच ओढ्याचे स्वरूप आले होते.तीन दिवसापासून पावसाची संततधार चालू असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.
या परिसरात अख्ख्या पावसाळ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होत नाही पाऊस मेच्या सुरुवातीला पहिल्यांदाच झाला असे शेतकरी सांगत आहेत.

स्थलांतर करण्याची वेळ
निरगुडे (ता. इंदापूर) येथील गावालगत असलेल्या ओढ्यालगत अनेक घरात पाणी शिरले आहे . सकाळपासूनच दुपारी एकपर्यंत जोरदार पाऊस सुरू आहे. पाऊस असाच सुरू राहिला अनेक कुटुंबांना स्थलांतरित करावे लागणार आहे.

01521

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka CM : DK शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार; नव्या मंत्रिमंडळात कोणाला लागणार लॉटरी?

Pune Civic Funds: पुणे महापालिकेला समाविष्ट ३२ गावांचा जीएसटी परतावा थकित; १८८६ कोटींअभावी पायाभूत विकास अडखळला

Latest Marathi Update Live: विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका आणि इतर मुद्द्यांवरून भोपाळमध्ये आंदोलन

तो ३०- ४० जण घेऊन माझ्या घराजवळ... पुसदमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेवर टोळक्याकडून हल्ला; नेमकं काय घडलं?

Mumbai-Goa Highway : कोकणवासीयांचा जीव टांगणीला! मंत्री गडकरींनी दिलेली डेडलाईन संपणार; मुंबई-गोवा हायवे पूर्ण होण्यासाठी अजून किती महिने वाट पाहावी लागणार?

SCROLL FOR NEXT