पुणे

पिंपळेतील दानपेटी चोरट्यांनी लांबविली

CD

शेटफळगढे, ता २७ : पिंपळे (ता इंदापूर) येथील पद्मावती मंदिरातील दानपेटीत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत मंदिर प्रशासनाच्या वतीने भिगवण पोलिसात लेखी अर्जही दिला आहे. मात्र तीन-चार दिवस उलटूनही पोलिस प्रशासन दखल घेत नसल्याची नाराजी ग्रामस्थ व्यक्त करीत आहे.
पिंपळे परिसरात २५ मे रोजी जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे मंदिर परिसरात सुकसुकाट असल्याचे ओळखून अज्ञात चोरट्यांनी रात्री एकच्या सुमारास मंदिराचे कुलूप तोडले तसेच सभा मंडपात असलेली दानपेटी चोरून नेली आहे. सदर घटना मंदिर परिसरात १असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज देखील पोलिसांना देण्यात आले आहे. पद्मावती देवीची यात्रा नुकतीच झाली होती. तेव्हापासून तीी उघडली नव्हती. यात्रा काळात भाविकांनी दानपेटीत टाकले दानही चोरीला गेले आहे.


मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून पुढील तपास चालू आहे. अद्याप कोणतेही धागेद्वारे हाती लागलेले नाहीत, असे भिगवण पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार रामदास कर्चे यांनी सांगितले.

दोन दिवसांत झालेल्या चोरी वरून व सीसीटीव्हीमध्ये चोरी करत असलेले व्यक्ती यांच्यामध्ये साम्य असल्यासारखे वाटत असल्याने लक्ष ठेवून चोरी झाली की काय प्रश्न पडत आहे.
- बाबूराव बागल, विश्वस्त सचिव पद्मावती देवस्थान, पिंपळे

घटनेची सविस्तर माहिती दूरध्वनी वरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली आहे. त्यावर तत्काळ उपमुख्यमंत्र्यानी पुणे पोलिस अधीक्षकांना तत्काळ कारवाई करण्याची सूचना दिल्या आहेत.
- अनिल बागल, सरपंच पिंपळे (ता इंदापूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

ऑफिसच्या कामांची सुट्टी! OpenAI ने लॉन्च केले GPT-5.4, आता तुमचा लॅपटॉप-कॉम्प्युटर चालवणार स्वतः AI

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमान 39.8°; 40 अंश पार होण्याची शक्यता

UPSC Exam Result : यूपीएससीत राज्यातील ६० उमेदवार उत्तीर्ण

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

SCROLL FOR NEXT