पुणे

शिंदेवाडीत शेतकऱ्याला बिबट्याचे दर्शन

CD

शेटफळगढे, ता. २३ : शिंदेवाडी (ता. इंदापूर) येथे गुरुवारी (ता. २२) संध्याकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.
शिंदेवाडी येथे गुरुवारी (ता. २२) संध्याकाळी सहा वाजता कुलदीप अर्जुन पवार हे त्यांच्या शिंदेवाडी येथील द्राक्ष बागेमध्ये औषध फवारणी करताना त्यांना अचानक बिबट्या समोर दिसला, मात्र त्यांनी प्रसंगाला धैर्याने तोंड देत बिबट्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना वाटले की, हे रानमांजर किंवा तरस असावे म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. पवार यांनी शिंदेवाडीचे पोलिस पाटील स्वप्नील शिंदे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिस पाटलांनी वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. बिबट्याच्या ठशाची तपासणी करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले, त्यांनी पाहणी केली व उपलब्ध माहितीनुसार संबंधित ग्रामस्थांना बिबट्यापासून घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. मात्र बिबट्या निश्‍चित कोणत्या दिशेने गेला आहे. याबाबत सांगता येत नसल्याने पिंजरा व कॅमेरा लावण्याबाबत वरिष्ठांना कल्पना दिल्याचे वन अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

बिबट्या आहे की, इतर प्राणी आहे? याविषयी तपासणी करण्यासाठी वन विभागाची टीम या ठिकाणी आली होती. या ठिकाणचे ठसे घेतले आहेत. मात्र याबाबत नक्की सांगता येत नाही. लोकांनी सावधगिरी बाळगावी, रात्री एकटे फिरू नये लहान मुले, वयस्कर माणसे यांनी काळजी घ्यावी, हातात काठी घ्यावी, रात्री शेतात जाणे टाळावे, फारच गरजेचे असेल तर बॅटरी, काठी हातात ठेवून तीन चार लोकांच्या समूहाने शेतात जावे. याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले आहे.
- भक्ती गायकवाड, वनरक्षक, वन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT