सुपे, ता.९ः सुपे (ता.बारामती) येथील बारामती तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात या हंगामात शनिवारी (ता.८) चिंचेच्या सुमारे १३ हजार ५०० पोत्यांची आवक झाली. गेल्या पंधरवड्यापासून येथील बाजारात चिंचेच्या लिलावास सुरुवात झाली आहे. या लिलावात अखंड चिंचेच्या एका क्विंटलला किमान दोन हजार ५०० ते कमाल आठ हजार ३०० रुपये बाजारभाव मिळाला. अखंड चिंचेला सरासरी दर तीन हजार ७०० मिळाला. फोडलेल्या चिंचेची सुमारे २०० पोत्यांची आवक झाली असून, त्यास क्विंटलला किमान नऊ हजार ४०० तर कमाल १२ हजार दर मिळाल्याची माहिती बारामती तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे, उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी दिली. शेतकऱ्यांनी चिंचमाल स्वच्छ व वाळवून आणला तर अधिक चांगला दर मिळेल अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.