पुणे

काऱ्हाटीतील जलव्यवस्थापनाचा मांडवेकरांकडून अभ्यास

CD

सुपे, ता. २१ ः राज्यात पहिल्या आलेल्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेतील काऱ्हाटी (ता. बारामती) या गावाने नेमके काय केले आहे, हे पाहण्यासाठी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील मांडवे (ता. खटाव) गावच्या सुमारे १०० प्रमुख गावकऱ्यांनी येथे भेट दिली. भूजलच्या कामांना भेटी दिल्या. येथील लोकसहभाग, जिद्द, निष्ठेने काम करण्याची पद्धत, शिस्त या गोष्टी जाणून घेतल्या. तसेच, येथील भूजल मित्र व काऱ्हाटी ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले.
मांडवे गावानेही सन २०२२-२३ मधील भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभाग घेऊन जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला होता. गावात मृद व जलसंधारणाची अनेक कामे केली. मात्र, राज्यात दीड कोटींचे प्रथम बक्षीस मिळवलेल्या काऱ्हाटी गावाने नेमके केले तरी काय? आपण कुठे कमी पडलो, हे पाहण्याची उत्सुकता होती. म्हणून काऱ्हाटीचे वेगळेपण पाहण्यासाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन येथील ग्रामस्थांनी केले होते.
मांडव्यातील सुमारे १०० शेतकऱ्यांनी नुकतीच काऱ्हाटी गावाला भेट देऊन येथील भूजल मित्रांशी चर्चा केली. स्कोप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शकिल मुजावर यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. काऱ्हाटीतील पाऊस पाण्याचे मोजमाप, विहीर पाणी पातळी, जल अंदाजपत्रक, जलसुरक्षा आराखडा याबाबत भूजल चमूचे अध्यक्ष के. एस. लोणकर यांनी उपस्थितांना माहिती दिली. राऊतखोरी, आसामी तलावाचे खोलीकरण, जलतारा प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग, नियंत्रित शेती पद्धतीत सचिन चांदगुडे यांचे पॉलिहाउस, लव्हेंडर गुलाब शेतीचे प्रयोग मांडवेकरांना दाखवण्यात आल्याची माहिती जी. एन. लोणकर यांनी दिली.
याप्रसंगी मांडव्याचे सरपंच सागर चंदनशिवे, ग्रामसेविका मनीषा सपकाळ, भूजलचे सहाय्यक भूवैज्ञानिक एन. एम. सय्यद, एस. डी. मुल्ला, समन्वयक मुजावर, काऱ्हाटीच्या सरपंच दीपाली लोणकर, ग्रामसेवक नीलेश धारकर, उमेद कार्यकर्त्या सुरेखा जाधव, दीपाली हिरवे, भूजल योजनेचे हृषिकेश पवार, वैभव भापकर, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

गावाविषयीची तळमळ भावली
काऱ्हाटीत लोकसहभाग आणि झोकून देऊन भूजल मित्रांची कामाची पद्धत आवडली. गावाची पाण्याविषयीची शिस्त पीक पद्धतीत बदल हा सोपा विषय नाही. पर्ज्यनमापक यंत्र व सरकारी योजनांचा पुरेपूर उपयोग केला. भूजल मित्र गावासाठी मनापासून काम करतात. त्यांची गावाविषयीची तळमळ भावली. कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारी पिके घेतली. भूगर्भातील साठा टिकून राहावा यासाठी तलावात वीजपंप टाकू दिला जात नाही. लोकसहभागातील शिस्त खूप महत्त्वाची आहे. हरितगृह, उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन खूप चांगल्या प्रकारे केल्याची माहिती मुजावर यांनी दिली.

41917

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana - Palash Muchhal: स्मृती-पलाशच्या लग्नात विघ्न! वडिलांना हृदयविकाराचा झटका, विवाहसोहळा रद्द

Solapur Police : पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यावरील गुन्हा रद्दबातल; मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूरचा निर्णय!

Weekly Horoscope Prediction : ह्या आठवड्यात 'या' मूलांकाच्या लोकांना मिळणार यश तर 'या' मूलांकाला आहे धोका !

Pankaja Munde PA Anant Garje Wife Gauri Garje यांनी उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबियांना घातपाताचा संशय

Pune Police Raid : पुणे पोलिसांचा मास्टरस्ट्रोक! २५० जवानांनी उमरठीत अवैध शस्त्र कारखान्यावर टाकला सर्वात मोठा छापा

SCROLL FOR NEXT