सुपे, ता.२४ : काळखैरेवाडीच्या (ता.बारामती) दरेकरवस्तीवरील शेतकऱ्याने गेल्या वर्षी प्रथमच दीड एकर उडदाचा प्रयोग यशस्वी केला. त्याला यश आल्यानंतर यंदा प्रयोगशील तरुण शेतकरी महेश अशोक दरेकर याने साडेचार एकर उडदाची लागवड केली. या भागात उडीद सहसा कोणी करत नव्हते, अशा स्थितीत शेतकऱ्याने वेगळा वाण करण्याचे धाडस करून कमी खर्चात अधिक उत्पन्नाचा मार्ग अवलंबला आहे.
दरेकर यांनी जूनमध्ये तीन एकर उडीद पेरला तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दीड एकर पेरला आहे. गेल्या वर्षी त्यांना दीड एकरात सुमारे अकरा क्विंटल उतारा मिळाला होता. त्याला बाजारभाव ८५ रुपये किलोप्रमाणे मिळाल्याने उत्पन्न चांगले मिळाले होते. इतर पिकांपेक्षा उडदाचे हे तीन महिने कालावधीत येणारे हे पीक आहे. त्याच्या शेंगा फुटत नाहीत. त्यामुळे नुकसान होत नाही. मळणी यंत्राद्वारे मळणी होते. बियाणे, पेरणी, मशागत, काढणी, मळणी अशी मिळून एकरी सुमारे नऊ हजार खर्च येतो. एकरी किमान सात ते आठ क्विंटल उत्पादन मिळाले तरी त्यापासून किमान ५० ते ६० हजारांचे उत्पन्न मिळते.
अधिक उत्पन्न मिळत असल्याने यंदाही उडदाचे पीक घेतले आहे. एकत्रित कुटूंबामुळे व घरची अवजारे असल्याने मशागत व मजुरीच्या खर्चात बचत होते. सध्या शेतात हळवी आणि गरवी तीन एकर कांदा आहे. एक एकर ऊस आहे. सहा एकर मका आहे. २५ गायांचा मुक्त गोठा असल्याचे महेश दरेकर याने सांगितले.
मे महिन्यात चांगला पाऊस झाल्याने मक्याच्या क्षेत्रात वाढ झाली. उडदाला चांगला बाजारभाव मिळतो. एकाचवेळी हार्वेस्टींग होत असल्याने शेतकऱ्यांचा उडीद करण्याकडे कल वाढल्याची माहिती सुपे मंडलामध्ये ७५ हेक्टर उडीद आहे. तर तालुक्यात ५९७ हेक्टर आहे. बियाची व चाऱ्याची मका अनुक्रमे तालुक्यात ४४०० व ६३६३ हेक्टर आहे. तर सुपे मंडलामध्ये ६११ व २५८० हेक्टर आहे.
- चंद्रकांत मासाळ, सुपे मंडळ कृषी अधिकारी
02195
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.