पुणे

कुतवळवाडीत आरोग्य शिबिराला प्रतिसाद

CD

सुपे, ता. १० : कुतवळवाडी (ता. बारामती) येथे झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात १०१ महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध अभियान अंतर्गत ॲनिमियामुक्त गाव अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषद, पंचायत समिती बारामती आरोग्य विभाग, ग्रामपंचायत कुतवळवाडी तसेच मयुरेश्वर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय मोरगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव यांच्यावतीने नुकतेच हे अभियान राबविल्याची माहिती सरपंच रूपाली भोसले यांनी दिली.
या शिबिराचे उद्‍घाटन सरपंच भोसले, डॉ. विशाल देवकाते, डॉ. प्रमोद पवार यांच्या हस्ते केले. या अभियानांतर्गत महिलांची हिमोग्लोबिन, रक्तदाब, शुगर तपासणी, कान, नाक, घसा तपासणी, हृदयरोग तपासणी, ईसीजी काढणे आदी तपासण्या केल्या.
या आरोग्य तपासणी शिबिरासाठी कुतवळवाडी ग्रामपंचायतीमार्फत शुगर तपासणी यंत्र, आवश्यक औषधोपचार व साहित्य पुरविल्याची माहिती भोसले यांनी दिली. याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे संचालक हरिभाऊ भोंडवे, माजी उपसरपंच भानुदास बोरकर, ग्रामपंचायत सदस्य अतुल कुतवळ, वेणूताई कुतवळ, दीपाली बोरकर, अरुण कुतवळ, लक्ष्मीकांत भोसले, ग्रामपंचायत अधिकारी अर्चना लोणकर, मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वंदना यादव, डॉ. मनिषा राठोड, मनिषा कुतवळ, भाग्यश्री कुतवळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Vidhan Bhavan Bomb Threat: विधानभवनात बॉम्बची धमकी! ई-मेलनंतर मुंबईत खळबळ; पोलिस-बॉम्ब स्क्वॉडची धावपळ, मोठी शोधमोहीम सुरू

Latest Marathi News Live Update : पुढील दोन दिवस उन्हाचा कडका, विदर्भासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तापमान 40 पार जाण्याची शक्यता!

LPG Cylinder Price Hike : गॅस संकट गडद, जाणून घ्या तुमच्या शहरात आज किती आहे LPG सिलिंडरचा दर ?

शुभमंगल सावधान! इशा डेचं धुमधडाक्यात लग्न, सोशल मीडियावर फोटो VIRAL

LPG Gas Crisis: पंधरा दिवस युद्ध चालल्यास गॅस संकट गडद; इंधन दरवाढीसह आयातीवर परिणाम साठेबाजी रोखण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT