पुणे

काळखैरेवाडीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

CD

सुपे, ता.१९ : काळखैरेवाडी (ता.बारामती) गावच्या हद्दीतील खैरेपडळ वस्तीजवळ अज्ञात महिलेचा खून झाल्याचे सोमवारी (ता.१९) निदर्शनास आले. अज्ञात आरोपी विरोधात सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.
सुपे-शेरेचीवाडी रस्त्यालगत मोकळ्या जागेत २५ ते २७ वर्षांच्या महिलेचा मृतदेह सापडला. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार अज्ञात कारणासाठी हा प्राणघातक हल्ला केल्याचे निदर्शनास आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी विरोधात सुपे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन व पोलिस ठाण्याचे तीन मिळून पाच पथके तपासासाठी रवाना केली आहेत. दरम्यान, घटनास्थळाला बारामती विभागाचे अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक व न्याय वैद्यक शास्त्रीय पथकाने भेट देऊन तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज व अन्य दुव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT