पुणे

इमारतीअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

CD

सुपे, ता. ३ ः बाबुर्डी (ता. बारामती) गावच्या हद्दीतील शेरीचीवाडीतील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना समाजमंदिरात बसून शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत. येथील अंगणवाडी इमारतीचे काम तातडीने मार्गी लावावे व येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहाची सोय करण्याची येथील ग्रामस्थांची मागणी आहे.
याबाबत येथील ग्रामपंचायत सदस्या रूपाली लडकत व ग्रामस्थांच्या सह्यांचे लेखी निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. गेल्या १५ वर्षांपासून गावात अंगणवाडी सुरू आहे. ही अंगणवाडी जुन्या इमारतीत चालू होती. ही इमारत धोकादायक झाल्याने गेल्या पाच वर्षांपासून नवीन इमारतीचे काम चालू आहे. आतापर्यंत तीन ठेकेदार बदलले गेले. मात्र, इमारतीचे काम अद्याप अपूर्ण असल्याने अंगणवाडी समाजमंदिरात भरवावी लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीत असलेले स्वच्छतागृह नादुरूस्त आहे. त्यामुळे विशेषतः विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत आहे. मुलींच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंगणवाडी इमारत व प्राथमिक शाळेच्या स्वच्छतागृहाचे काम तातडीने पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

अंगणवाडी इमारतीच्या आतील दरवाजाचे काम झाले आहे. छताच्या वॉटर प्रुफींगचे काम तातडीने पूर्ण करण्यास ठेकेदाराला सूचना केल्या आहेत. प्राथमिक शाळेतील स्वच्छतागृहाचे कामही लवकरच मार्गी लागेल.
- दत्तात्रेय ढोपरे, सरपंच

02384

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईहून दुबईला निघालेलं विमान, उतरण्याआधी आला मिसाइल अलर्ट; हवेतच 'डबल रिवर्स'ची दुर्मिळ घटना, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : कोरेगाव पार्क - मुंढवा रोडवर होळीच्या कार्यक्रमात लाईटचे गर्डर पडून 16 जण जखमी

Wani Crime : धक्कादायक! लग्नासाठी मुलीला कुटुंबाच्या खुनाची धमकी; भाजप जिल्हाध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल

Kolhapur Tragic Incident : घरात कोणालाही आपल्या मनातलं सांगितलं नाही, बारावीच्या विद्यार्थ्यांने थेट उचललं टोकाचं पाऊल

Horscope : भाग्यशाली बुधवार! उद्या 'या' चार राशींच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट; अचानक मिळणार पैसे, अडकलेले काम होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT