सुपे, ता. २३ : निवडणूक म्हटली की पूर्वी पिठलं भाकरी आणि भेळ असायची. कुतवळवाडी (ता. बारामती) येथे त्याच्या आठवणी गुरुवारी (ता. २३) निवडणुकीनिमित्ताने जाग्या झाल्या.
दिवसभर उन्हाचा वाढलेला कडाका. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांना करावा लागत होता. कडक उन्हामुळे मतदानाची टक्केवारी दुपारी चांगलीच घटली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला होता. ऊन कमी झाल्यानंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढू लागली. मतदानाची टक्केवारी वाढली. दिवसभर उन्हात कार्यकर्ते फिरत होते. सायंकाळी सहानंतर मतदान केंद्राजवळ झाडाखाली कार्यकर्ते दमून भागून बसले होते. यावेळी जी. बी. चौधरी यांनी भेळीची कल्पना मांडली. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. सर्वांनी भेळीचा आस्वाद घेतला. यात काही जुने कार्यकर्तेही होते. त्यामुळे पंचवीस तीस वर्षांपूर्वी पिठलं भाकरी आणि भेळीवर होणाऱ्या निवडणुकीच्या आठवणी जाग्या झाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.