पुणे

रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती

CD

शिरूर, ता. १३ : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ‘श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट’च्या नवीन विश्वस्त मंडळाची निवड प्रक्रिया जाहीर झाली असून, पुणे सत्र न्यायालयाने मुलाखतींद्वारे पाच विश्वस्त नव्याने नियुक्त केले आहेत.
कोरोना काळात जुन्या विश्वस्त मंडळाची मुदत संपली होती. परंतु, त्या कालावधीत निवड प्रक्रिया न झाल्याने जुन्या विश्वस्तांना मोठी मुदतवाढ मिळाली होती. त्यामुळे नव्याने नियुक्तीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली होती व त्यासाठी अनेकजण इच्छुक होते. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांची मुलाखतीद्वारे नियुक्ती सत्र न्यायालयामार्फत केली जाते. देव घराण्यातील दोन प्रतिनिधी, दोन स्थानिक व एक जिल्हा परिसरातील, असे पाच प्रतिनिधी विश्वस्त मंडळावर घेतले जातात. रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी यावेळी अनेकजण इच्छुक असल्याने मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने मुलाखतींसाठी तीन न्यायाधीशांचे पॅनेल तयार केले होते. त्यामार्फत तब्बल ३९५ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामधून गुरुवारी (ता. १२) नवीन विश्वस्तांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार, देव घराण्यातील ओमकार नितीन देव व विजय काशिनाथ देव यांची; तर स्थानिक प्रतिनिधी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती दत्तात्रेय पाचुंदकर व उद्योजक तुषार बाळासाहेब पाचुंदकर आणि जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून कन्हेरसर (ता. खेड) येथील संदीप तुकाराम दौंडकर यांची विश्वस्त मंडळावर नियुक्ती केली. या नूतन विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ पुढील पाच वर्षांसाठी आहे.
देवस्थानच्या कार्यालयात नवीन विश्वस्त मंडळाने पदभार स्वीकारला. त्यावेळी रांजणगाव आणि परिसरातील विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

SCROLL FOR NEXT