पुणे

गर्दीचा फायदा घेत चोरट्याकडून महिलेच्या पर्समधील दागिने लंपास

CD

शिरूर, ता. ८ : शिरूर बसस्थानकावरून एसटीने नवी मुंबई येथे निघालेल्या महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत सुमारे तीन लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविले. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
सुरेखा शिवाजी खामकर (रा. पानोली, ता. पारनेर, जि. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा खामकर या सध्या नवी मुंबईतील नेरूळ येथे वास्तव्यास असून, कौटुंबिक कामानिमित्त त्या दोन दिवसांपूर्वी मुलांसह पानोली येथे आल्या होत्या. नेरूळ येथील घरीही कुणी नसल्याने त्यांनी आपले सोन्याचे दागिने सोबत आणले होते. आज पानोली येथून पुन्हा नवी मुंबई येथे जाण्यासाठी त्या सकाळी शिरूर बसस्थानकावर आल्या. दागिने असलेली पर्स त्यांनी गळ्यात अडकवली होती. साडेदहाच्या सुमारास जामखेड - मुंबई एसटी बसमध्ये त्या बसल्या. त्यावेळी एसटीत गर्दी होती. बसायला जागा नसल्याने त्या पुन्हा खाली उतरू लागल्या, त्यावेळी शिक्रापूरजवळ दोन जागा खाली होणार असल्याचे वाहकाने सांगितल्याने त्या बसमध्ये थांबल्या. तिकीट फाडण्यासाठी वाहक त्यांच्याजवळ आला तेव्हा त्यांनी पैसे देण्यासाठी पर्स उघडली असता पर्सच्या चोर कप्प्याची चेन उघडी असल्याने शंका आल्याने त्यांनी पर्समधील दागिन्यांची चाचपणी केली असता, पर्समधील पाकिटात ठेवलेला दागिन्यांचा छोटा डबा नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी वाहकास ही बाब सांगून बस थांबविण्यास सांगितले. दरम्यान, त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
खामकर यांच्या पर्समधून चोरीला गेलेल्या दागिन्यांच्या डब्यात दोन लाख रुपये किमतीचा चार तोळे वजनाचा सोन्याचा श्रीमंत हार, एक लाख रुपये किमतीचे प्रत्येकी दोन कर्णफुले व वेल आणि ६५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या रिंगा, पदक असा सुमारे तीन लाख ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला असून, बसस्थानकावरील चोरीची ही घटना समजताच शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, बसस्थानक सुरू होऊन चार महिने उलटूनही सीसीटीव्ही लावले नसल्याने चोरांना आयतेच रान मोकळे मिळाले आहे. बसस्थानक परिसरात तातडीने सीसीटीव्ही लावावेत, अशी मागणी प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT