पुणे

शिरूर शहरातून बुलेट चोरीला

CD

शिरूर, ता. ८ ः शिरूर शहर व परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना नित्याच्या झाल्या असून, नुकतीच एक नवी कोरी बुलेट चोरीला गेल्याने दुचाकी मालक धास्तावले आहेत.
उमेश आनंदा इसवे (रा. सुशीला अपार्टमेंट, रेव्हेन्यू कॉलनी, शिरूर) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बुलेट चोरीचा गुन्हा दाखल केला.
इसवे यांनी घराजवळच्या पार्किंगमध्ये लॉक करून ठेवलेली सुमारे दीड लाख रुपये किमतीची बुलेट चोरीला गेली. शिरूर तालुक्याच्या विविध भागातून दररोज किमान एक दुचाकी चोरीला जात असून, अनेक दुचाकींचा कुठलाही ठावठिकाणा लागत नसल्याचे चित्र आहे. काहींच्या चोरीला गेलेल्या दुचाकी कुठेतरी अज्ञात ठिकाणी सापडतात. परंतु, चोरटे या दुचाकींतील महत्त्वाचे स्पेअर पार्ट काढून या दुचाकी सोडून देत असल्याचेही निदर्शनास आले आहे. दहा ते पंचवीस हजार रुपये किमतीच्या दुचाकी सापडल्यानंतरही त्या सोडविण्यासाठी दोन ते पाच हजार रुपये खर्च येत असल्याने दुचाकी चालक त्रस्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT