पुणे

शिरूरमध्ये वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यानाचे आयोजन

CD

शिरूर, ता. १० : महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिरूर नगर परिषद व येथील ''राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने ११ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी (ता. ११) महात्मा फुले यांना अभिवादन करून या कार्यक्रमांची सुरुवात होणार असून सायंकाळी सात वाजता सिनेपार्श्वगायक संतोष जोंधळे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (ता. १२) राज्यस्तरीय कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सकाळी ११ वाजता या स्पर्धेला सुरवात होईल. त्याच दिवशी सायंकाळी बक्षिस वितरण केले जाणार असून, बक्षिस वितरणानंतर शाहीर रामानंद उगले यांचा पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवारी (ता. १३) शिवव्याख्याते सुभानअली शेख यांचे ''शिवराय ते भीमराव'' या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्काराचे वितरण होणार आहे. शुक्रवारी (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अभिवादन, धम्मवंदना व सायंकाळी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री आठ वाजता आनंद शिंदे यांचा गाण्याचा कार्यक्रम होणार असून, त्यात ते भीमगीते सादर करणार आहेत.
या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन फुले - आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भालेराव व नगर परिषदेचे मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Crime: भोंदू खरातच्या ऑफिसबॉयला अटक, कार्यालयातलं सीसीटीव्ही फुटेज लीक करत फोडलेलं बिंग

अवकाळी पाऊस नैसर्गिकच, केमिकल ट्रायलचा दावा निराधार; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

रुपया सार्वकालिक नीचांकी, डॉलरच्या तुलनेत ६४ पैशांनी कोसळून ९३.५३ वर

Chhatrapati Sambhajinagar News: भोकरदनमध्ये दुर्दैवी घटना; खदानीत बुडून माय-लेकीचा मृत्यू, परिसरात शोककळा

Income Tax: १९६१ चा प्राप्तिकर कायदा इतिहासजमा; नव्या करप्रणालीचा ‘प्रारंभ’ देशभर सुरू

SCROLL FOR NEXT