पुणे

रांजणगाव गणपतीहून महिला बाळासह बेपत्ता

CD

शिरूर, ता. १८ : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील २२ वर्षीय महिला आपल्या दोन वर्षांच्या बाळासह १५ दिवसांपासून बेपत्ता आहे. शोध लागत नसल्याने तिचा कुटुंबीयांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली आहे. संगीता सागर खाडे (वय २२) या नील सागर खाडे (वय २) अशी त्यांचे नावे आहेत.

संगीता यांचे वडील विष्णू काशिनाथ शेकडे (रा. सरदवाडी, ता. शिरूर) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात ते दोघे हरविल्याची खबर दिली. संगीता यांचा चार वर्षांपूर्वी सागर खाडे यांच्याशी विवाह झाला असून, त्या पतीसह रांजणगाव येथील संकल्प सिटी येथे सोमनाथ खंडू घोडे यांची रूम भाड्याने घेऊन राहात होत्या. काही दिवसांपूर्वी, त्यांचे पतीशी दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. गेल्या सोमवारी (ता. ५) शेकडे यांनी नेहमीप्रमाणे नातू नील याच्याशी बोलण्यासाठी मुलगी संगीता हिच्या मोबाईलवर संपर्क केला असता, तिचा मोबाईल बंद लागला. यामुळे त्यांनी जावई सागर खाडे याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यांनी मी पुण्याला आलो आहे व संगीता तुमच्याकडेच आली असेल असे सांगितले. दरम्यान, शेकडे यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण ती आढळून आली नाही.
दरम्यान, संगीता खाडे यांची उंची पाच फूट तीन इंच आहे. गोरा वर्ण, गोल चेहरा, काळे डोळे, सरळ नाक, मध्यम बांधा असे त्यांचे वर्णन असून, घरातून बाहेर पडेतवेळी त्यांच्या अंगावर काळ्या रंगाचा ड्रेस होता. तर नीलचा वर्ण गोरा व चेहरा गोल आहे. वरील वर्णनाच्या महिलेविषयी व मुलाविषयी माहिती समजल्यास रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याशी (०२१३८ : २३२१३९) किंवा या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस हवालदार गुलाब येळे (संपर्क क्र. ९१३०३८९७८५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
02547

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT