पुणे

शिरूरमधील रामलिंग मंदिरात दर्शनासाठी गर्दी

CD

शिरूर, ता. २१ : शिरूर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून भाविकांची गर्दी झाली होती. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारमुळे मंदिरातील शिवलिंगाच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर रांगा लागल्या होत्या.
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी आज (ता.२१) सकाळी, श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पोपटराव दसगुडे यांच्या हस्ते शिवलिंगावर अभिषेक झाल्यानंतर सामुहीक आरती झाली. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली.
श्री रामलिंगाचे हेमाडपंथी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याची उभारणी करून, त्यात खुद्द प्रभू श्री रामचंद्रांनी शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याची अख्यायिका आहे. यामुळे मंदिरातील शिवलिंगाला रामलिंग नाव पडले. येथे जिल्ह्याच्या विविध भागातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. श्रावण महिन्यात व सोमवारी भाविकांच्या गर्दीत आणखी भर पडते. शिरूर शहरातून अनेक शिवभक्त पहाटे पायी चालत या मंदिरात दर्शनासाठी जातात.
मुख्य गाभारा, त्यापुढे सभामंडप व पुढे मेघडंबरीतील नंदी अशी या मंदिराची रचना असून, सभोवताली तटबंदी आहे. अग्रभागी मुख्य प्रवेशद्वार व नगारखाना असून, काही वर्षांपूर्वी दानशूर उद्योगपती (स्व.) रसिकलाल धारिवाल यांनी स्वखर्चातून प्रवेशद्वार व नगारखाना इमारतीचा जीर्णोद्धार केला. संगमरवरी फरशीतून भिंती अच्छादल्या असून, खाली ग्रेनाईट बसविले आहे. श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदाची धुरा सध्या प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या खांद्यावर आहे. अनेक शिवभक्तांनी मंदिर विकासासाठी देणग्याही दिल्या.
दरम्यान, पहिल्याच श्रावणी सोमवारनिमित्त झालेल्या गर्दीमुळे परिसरात थाटलेल्या खाद्यपदार्थ, खेळणी व विविध प्रकारच्या दुकानांमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
02794

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT