पुणे

महागणपती मंदिर परिसरात मोगऱ्याच्या सुगंधाचा दरवळ

CD

शिरूर, ता. २३ : महागणपतीची शाही महापूजा मोगऱ्याच्या फुलांनी, शाही वस्त्रसाज देखील मोगऱ्याच्या फुलांचाच आणि महागणपतीचा गाभाराही लाखो मोगऱ्यांनी सजलेला... पुष्टीपती विनायक जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. २३) रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील महागणपती मंदिरात मोगरा महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी केवळ गाभाराच नाही तर अवघा मंदिर परिसर मोगऱ्याच्या सुगंधाने दरवळला होता. ''महागणपती मोरया'' च्या गजराने प्रसन्नता व उत्साहात भर पडत होती.
प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर परिसर व गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट केली होती. पहाटे, श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे सचिव डॉ. तुषार पाचुंदकर यांच्या हस्ते महागणपतीला अभिषेक घातल्यानंतर मोगरा महोत्सवाला सुरवात झाली. मोगऱ्याच्या माळांत छोटी रंगीबेरंगी फुले माळून गाभारा सजविण्यात आला. छताचे झुंबर, प्रवेशद्वाराच्या महिरपी, महागणपतीच्या मेघडंबरीच्या कमानी देखील मोगऱ्याच्या माळांनी सजविण्यात आल्या. महागणपतीच्या भोवती मोगऱ्याच्या फुलांच्या राशी उभारल्यानंतर मोगरा आणि गुलाबाच्या फुलांत दूर्वा गुंफून केलेला हार महागणपतीला परिधान करण्यात आला. सुवर्णालंकारांच्या जागीही आज मोगऱ्याच्या माळाच होत्या. तर महागणपतीचे मस्तक देखील मुकूटाऐवजी मोगरा आणि इतर रंगीबेरंगी फुलांनी सजविले होते. देवस्थान ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते दुपारी महापूजा झाली. यावेळी दर्शन रांगेतील पहिल्या भाविकाला आरतीचा मान देण्यात आला. आरतीनंतर महागणपतीला आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला, अशी माहिती डॉ. देव यांनी दिली.
सुट्यांमुळे भाविकांची सहकुटुंब उपस्थिती
जयंतीचे औचित्य साधून महागणपतीच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी होती. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने दर्शन रांगेवर मंडप उभारण्यात आला होता. सुट्यांमुळे भाविकांची सहकुटूंब उपस्थिती होती. दुपारच्या महाआरतीनंतर दाखविलेला आंब्यांचा महानैवेद्य भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला.


03756

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT