पुणे

लघुशंकेचा बहाणा करून पळालेला शिरूरचा आरोपी पुन्हा गजाआड

CD

शिरूर, ता. ८ : तळोजा येथील कारागृहात नेत असताना लघुशंकेचा बहाणा करून पोलिसांना गुंगारा देत पळून गेलेल्या चोरट्याला शिरूरच्या पोलिस पथकाने गुन्हे शोध पथकासह तळोजा कारागृहाचे पथक व स्थानिक पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी (ता. ८) रात्री पुन्हा गजाआड केले.
शिरूर येथील जैन मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी गेल्या २० एप्रिलला सुमारे दोन लाखाची रोकड व पद्मावती देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेल्याने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील तिघांच्या टोळीला इतर गुन्ह्यात पकडून तळोजा कारागृहात ठेवले होते. जैन मंदिर चोरीप्रकरणी अधिक चौकशीसाठी शिरूरला आणले होते. पुन्हा तळोजा कारागृहात नेले जात असताना कारागृहापासून एक किलोमीटर अलिकडे लघुशंकेचा व पोट दुखत असल्याचा बहाणा करून मुजाहीद गुलजार खान (रा. कारेगाव, ता. शिरूर) याने पोलिसांना वाहन थांबविण्यास भाग पाडले व आडोशाला जात पळ काढला. या प्रकारावरून पोलिसांवर टीकेची झोड उठली होती.
दरम्यान, शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांनी या प्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवित पोलिसांची चार पथके तयार केली. स्थानिक दुवे शोधून काढत मुजाहीद खान याच्या बेलापूर पंचशील परिसरातून पुन्हा मुसक्या आवळल्या. त्यामुळे पोलिसांचा जीव भांड्यात पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO चे माजी शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर जासूसी प्रकरण

Palghar News: शेतकऱ्यांकडून धान्य खरेदीस सुरुवात, पण पैसे रखडले; बळीराजा आर्थिक अडचणीत

Ajit Kale: हक्काच्या जमिनी मिळेपर्यंत लढणार: ​अ‍ॅड. अजित काळे यांचा इशारा, २० मार्चला आत्मक्लेष आंदोलन!

SCROLL FOR NEXT