पुणे

शिरूरच्या पाचर्णे यांची पंढरपूरच्या मंदिरास देणगी

CD

शिरूर, ता. ३ : तर्डोबाची वाडी (ता. शिरूर) येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक सेलचे उपजिल्हाध्यक्ष सुरेश पाचर्णे यांनी आई-वडीलांच्या स्मरणार्थ पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला एक लाख एक हजार १११ रुपयांची देणगी दिली.
सुरेश पाचर्णे यांचे वडील ठकाजी आणि आई कलाबाई यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. पांडुरंगावर त्यांची निस्सीम श्रद्धा होती. आषाढी वारी काळात ते पंढरपूरला दर्शनासाठी जायचे. त्यामुळे आषाढी वारी सुरू झाल्याने सुरेश पाचर्णे यांनी पंढरपूर येथे जाऊन एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयांची देणगी समितीकडे सुपूर्द केली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव गिरमकर, सरदवाडी येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गौतम घावटे, सामाजिक कार्यकर्ते गोरख घावटे आदी उपस्थित होते. या देणगी नंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पाचर्णे यांना तहसीलदार बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी ची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

Pune Robbery: निगडे गावातील जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघा आरोपींना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT