Pune 
पुणे

पुणे : बंडगार्डन रोड येथील अतिक्रमणावर अखेर कारवाई

प्रशासनाने अतिक्रमण धारकांना नोटीसही बजावली होती. याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल झाली होती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील बंडगार्डन येथील अतिक्रमणावर अखेर गुरूवारी कारवाई करण्यात आली. बंडगार्डन रोड येथे केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. कडेकोट पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी अतिक्रमण पाडले.

बंडगार्डन रोड येथील प्लॉट नंबर २४६ येथे अतिक्रमण झाले होते. या मिळकतीवर एकूण १३३ अतिक्रमणं होती. यात ३५ रहिवासी, वाणिज्य ९४, मंदिर ३ आणि एक सार्वजनिक स्वच्छतागृह याचा समावेश होता. ही अतिक्रमणं २० ते २५ वर्षांपासून होती. प्रशासनाने अतिक्रमण धारकांना नोटीसही बजावली होती. याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल झाली. मात्र, न्यायालयाकडून या अतिक्रमण धारकांना दिलासा मिळाला नव्हता.

अखेर गुरुवारी अतिक्रमण विरोधी पथकने या अतिक्रमणावर कारवाई केली.  पोलीस उपायुक्त समर्थना पाटील, उपविभागीय अधिकारी स्नेहल पिशवी देवकाते, व्यवस्थापक संचित मालमत्ता तथा तहसीलदार पुणे शहर सूर्यकांत येवले, तहसीलदार शंकर,  दुबे शितल देसाई सीमा गेंजे तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी एमएसईबी चे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने सदरची कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अवघ्या १५ रुपयांत विकले जाताहेत अशोक खरातच्या अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ; खळबळजनक प्रकाराने संतापाची लाट

Career Numerology : राजयोग घेऊन जन्माला येतात 'या' 4 मुलांकाचे लोक; सरकारी नोकरीत मिळवतात यश, पण एक चूक बर्बाद करते आयुष्य

Latest Marathi News Live Update: हिंदू जनआक्रोश मोर्च्यात जाण्याआधी आमदार गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी अडवलं

Nashik Crime : सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा अड्डा उद्ध्वस्त; चौघांना बेड्या; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Ishwarpur labour: बांधकाम कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड! युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम; ईश्वरपूर परिसरातील चित्र

SCROLL FOR NEXT