पुणे

वनविभागाच्या उपाययोजनांचा बिबट्याकडून फडशा

CD

नितीन बारवकर : सकाळ वृत्तसेवा
शिरूर, ता. ७ : शिरूर, जुन्नरसह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांत बिबट्याच्या उपद्रवाचे आणि मानवावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहेत. मात्र, प्रशासन पातळीवर मात्र पुरेसे गांभीर्य नसल्याचेच दिसत आहे. वनविभागाच्या तोकड्या उपाययोजनांपुढे बिबट्या भारी ठरत असताना आणि गेल्या दोन वर्षांत आठजणांना जीव गमवावा लागला असताना शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचा कारभार मात्र गेल्या तीन महिन्यांपासून प्रभारीच्या जीवावरच बेतला असल्याचे चित्र आहे.
जुन्नर वनविभागांतर्गतही बिबट्याची समस्या आ वासून उभी असताना कामातील सुसूत्रतेबाबत सावळा गोंधळ दिसून येत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या दोन वर्षांत दहाजणांना जीव गमवावे लागले आहेत. बिबट्याच्या डरकाळ्यांमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.


शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांची गेल्या १८ ऑक्टोबर २०२४ ला बदली झाली. त्याच दिवशी मांडवगण फराटा येथे वंश राजकुमार सिंह (वय ६) या बालकाला बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जीव गमवावा लागला. त्याचवेळी चाकणचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांच्याकडे शिरूरचा प्रभारी चार्ज देण्यात आला. बिबट्याच्या मोठ्या आपत्तीची गंभीर परिस्थिती असताना आणि महिनाभर त्यांच्याकडे शिरूरची जबाबदारी असतानाही एखाद-दुसरा अपवाद वगळता त्यांनी शिरूरकडे ढुंकूनही पाहिले नाही.


मृत्यूंबाबत प्रशासनाला नाही सोयरं सुतक
जांबूत, पिंपरखेड भागात सन २०२३ मध्ये चौघांना बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागूनही त्यातील दोघांपर्यंत मदत पोचलेली नाही. शिरूरचे वनपरिक्षेत्र कार्यालय म्हणजे आवो-जावो घर तुम्हारा या तत्त्वावरच चाललेले दिसते. २१ व्या शतकात प्रवेश केला असताना या प्रगत युगातही हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्यात मानवी मृत्यू हे खरेतर प्रगत यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे प्रसंग असून, गतिमान म्हणविणाऱ्या प्रशासनाला काळिमा फासणारे प्रकार असतानाही प्रशासकीय पातळीवर याचे फारसे सोयरं सुतक कुणालाही दिसत नाही.

डरकाळ्यांनी धास्तावलेले ग्रामस्थ; मात्र प्रशासन सुस्त
१. शिरूर कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारीपद रिक्त
२. शिरूर वनपरिमंडळात तीन, शिक्रापूर चार आणि पिंपरखेड वनपरिमंडळाच्या नियतक्षेत्रात दोन असे नऊ वनरक्षक कार्यरत
३. त्यांच्यावरील नियंत्रणासाठी तीन परिमंडळात तीन वनपाल.
४. बिबट उपाययोजनांबरोबरच त्यांच्यावर इतर जबाबदाऱ्याही असल्याने बिबटे उदंड झाल्याचे भयावह चित्र
५..गेल्या काही महिन्यांत बिबट्यांची संख्या वाढली असून, त्यांचे जनावरांसह मानवांवरील हल्ल्यात वाढ.


वनपालांची मशिन्स स्थानिक गुराख्यांकडे
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना रात्र गस्तीसाठी वाहने दिली जातात. मात्र या गाड्या पेट्रोलिंगसाठी न फिरता केवळ बिले आणि भत्ते लाटले जात असल्याचे चित्र आहे. वनांच्या रक्षणासाठी वनपालांची नेमणूक असून, ते आपल्या कर्तव्याकामी फिरत असल्याचे दिसून यावे यासाठी त्यांच्याकडे मशिन दिले जायचे. काही अनेक वनपालांनी त्यांची मशिन्स स्थानिक गुराख्यांकडे दिल्याच्या धक्कादायक तक्रारी ग्रामीण भागातून केल्या गेल्या आहेत.

तांत्रिक कारणे पुढे करून नाकारली मदत
शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांपैकी केवळ
पाचजणांना शासकीय मदत मिळाली आहे. तांत्रिक कारणे पुढे करून अनेकांना मदत नाकारली गेली आहे. संशयास्पद मृत्यू असाच शिक्कामोर्तब करणाऱ्या वनखात्याने या प्रकरणांची उकल केली नसल्याचे वास्तव आहे. काही प्रकरणात दुसऱ्या यंत्रणेवर, काहीवेळा कुटुंबीयांवर तर काही प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्याच्याच माथी मृत्यूचे कारण मारल्याचा प्रतापही वनखात्याने केला आहे.


शिरूर व हवेली तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या, वाढता उपद्रव आणि त्यावर उपाययोजना व बंदोबस्त करण्याकामी धोरणात्मक पावले उचलण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गळ घातली आहे. तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना म्हणून तीनशे पिंजऱ्यांसाठी निधी उपलब्ध होणार आहे.
- ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके, आमदार, शिरूर - हवेली


बिबट्यांच्या दहशतीमुळे रात्रीची शेतीची कामे तर बंदच झाली आहेत. पण आता दिवसादेखील बिबट्यांचा उपद्रव वाढला आहे. बिबट्या दिसल्यास वनखात्याला कळवावे म्हटले तरी कुणीही तातडीने फोन उचलत नाही, योग्य प्रतिसाद देत नाही असा सर्वसाधारण अनुभव आहे. दुसऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा संपर्क क्रमांक देऊन जबाबदारी ढकलून लावली जात आहे.
-विशाल घोरपडे , शेतकरी, कुरूळी, ता. शिरूर

सध्या बिबटे जास्त आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे कमी अशी विरोधाभास आहे. त्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. एक बिबट्या पकडला तरी दुसऱ्या बिबट्याचे भय काही संपत नाही. तसेच बिबट्याचा माणसांवर हल्ला करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. एकंदरीत यावर शासनाने प्रभावी मार्ग काढून शेतकऱ्यांना भयमुक्त करणे गरजेचे आहे.
- श्‍यामकांत ढोरजकर, सदस्य, ग्रामपंचायत निमोणे, ता. शिरूर

पदभाराच्या कारभाराचा सामान्यांना फटका
१. मंचरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्याकडे पदभार आल्यानंतर त्यांनाही शिरूरसाठी अधिकचा वेळ देता आला नाही. त्यामुळे पुन्हा संतोष कंक यांनाच प्रभारी म्हणून लक्ष देण्यास सांगण्यात आले.
२. पदभार याच्याकडे की त्याच्याकडे अशी अवस्था असताना १५ नोव्हेंबरला पुन्हा मांडवगण येथेच बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली व त्यात शिवतेज समाधान टेंभेकर या चार वर्षीय बालकाचा जीव गेला.
३. प्रभारी मार्फतच तकलादू उपाययोजना चालू असताना २४ डिसेंबरला पिंपळसुटी येथे रक्षा अजिनाथ निकम ही पाच वर्षीय बालिका बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली.
४. तीनही घटना शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात घडल्या असून, तत्पूर्वी २६ ऑगस्ट २०२४ ला जांबूत येथे मुक्ताबाई भाऊ खाडे या महिलेचा भरदिवसा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला.
५. दहिवडी येथे यश गायकवाडच्या मृत्यूबाबत अद्याप तरी वनखाते बिबट्याचा हल्ला मानायला तयार नाही.
६. बेट भागात सशाच्या शिकारीसाठी वाघूर लावणाऱ्या एका महिलेचीही बिबट्याने शिकार केली. तिलाच्या कुटुंबालाही कसलीच मदत मिळालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : चार सामने अन् Orange Cap साठी ७ दावेदार! विराटचा शेवटचा क्रमांक, Vaibhav Sooryavanshi पण आहे पुढे, टॉपर कोण?

डोळ्यात संताप अन् लेकरासाठीची तगमग; प्रार्थना बेहेरेच्या 'मर्दिनी'चा टीझर प्रदर्शित; दिसणार अभिनेत्रीचा दमदार अंदाज

कला, नृत्य आणि विज्ञानाचा संगम... मुंबईत ओपन सायन्स पार्क साकारतंय! विज्ञान शिकणं होणार आणखी रंजक

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Nautapa 2026: नवतापा म्हणजे काय? वर्षातील सर्वात गरम दिवसांमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT