पुणे

रांजणगावकरांचा पाणीप्रश्‍न सुटण्याच्या मार्गावर

CD

शिरूर, ता. २५ : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) गावासाठी जलजीवन मिशनअंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी संबंधित विभागाला दिली. विधानसभा निवडणुकीत रांजणगाव व परिसराने जिद्दीने दिलेल्या योगदानाची ही पोचपावती असल्याचे मानले जात आहे.

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी या निर्णयाची माहिती दिली. रांजणगावला असलेले आध्यात्मिक महत्त्व, ग्रामपंचायत हद्दीतील एमआयडीसीमुळे वाढलेला विस्तार या पार्श्वभूमीवर सर्व नागरीकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने नवीन पाणीपुरवठा योजना व्हावी, याबाबत पाचुंदकर यांनी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री पवार व संबंधित विभागाकडे गेली. तीन महिने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन रांजणगावसाठी जलजीवन अंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या सूचना देतानाच अजित पवार यांनी याकामी तब्बल ६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
रांजणगावचा पाणीप्रश्न व विविध विषयांबाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्या मंत्रालयातील कक्षात झालेल्या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, एमआयडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक कुणाल खेमनार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता वैशाली आवटे, एमआयडीसीचे जनरल मॅनेजर बप्पासाहेब थोरात आदी उपस्थित होते. उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, हे दुरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
मानसिंग पाचुंदकर यांच्यासह रांजणगावचे उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अमोल जगताप, रांजणगाव सोसायटीचे माजी अध्यक्ष महेश फंड, प्रा. माणिक खेडकर, युवा उद्योजक राहुल शेळके, प्रतापराजे फंड, दीपक खैरे आदी स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


अष्टविनायकांपैकी एक असलेले रांजणगाव गणपती हे राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, पर्यटनस्थळ म्हणूनही हे स्थान नावारूपाला येत आहे. या परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक उद्योग-व्यवसाय उभे राहिले आहेत. त्यामुळे रांजणगाव ग्रामपंचायत हद्दीत स्थलांतरित लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. त्याचा ताण ग्रामपंचायतीच्या पायाभूत सुविधांवर पडत आहे. भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री,

रांजणगाव गणपतीचा वाढता विस्तार व विकासाच्या दिशेने चाललेली वाटचाल नवीन पाणीपुरवठा योजना व विकास कामांमुळे आणखी वेगवान होणार आहे. विधानसभा निवडणूक प्रचार काळातच अजितदादांनी रांजणगावच्या पाणीपुरवठा योजनेबाबत होकार दर्शविला होता. याबाबत संबंधित विभागाला सूचना देत भरीव निधीची तरतूद केल्याने व रांजणगावची आश्वासनपूर्ती झाल्याने समाधान आहे.
- मानसिंग पाचुंदकर, अध्यक्ष, आंबेगाव - शिरूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

Viral Indian Wedding Funny Moment : या नवरदेवानं तर हद्दच केली! लग्नात 'चमकायच्या' नादात अंगालाच गुंडाळली लाईटिंग; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Shani Gochar 2026: 21 मार्चपासून शनि नक्षत्र गोचर! ‘या’ 3 राशींचा सुरू होणार गोल्डन टाईम

IPL 2026 Tickets: मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स अन् RCB सह सर्व संघांची तिकिटं कुठे खरेदी करता येणार? किंमत किती असणार?

Equestrian Statue: बीबीदारफळमध्ये मध्यरात्रीच उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; हटविण्यास ग्रामस्थांचा विरोध, पाेलिसांशी वादावादी!

SCROLL FOR NEXT