पुणे

शिरूर परिसरात तरुणीची आत्महत्या

CD

शिरूर, ता. २५ : शहरापासून जवळच रामलिंग रस्ता परिसरातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या अंजली गजानन टिपरे (वय १८) या तरुणीने घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (ता. २४) सकाळी ही घटना उघडकीस आली असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
अंजली ही आपले काका राजू रामदास टिपरे (रा. पोदार शाळेजवळ, रामलिंग रस्ता, शिरूर) यांच्या कुटुंबीयांसोबत राहून त्यांच्यासोबतच वीटभट्टीवर देखील काम करीत होती. मूळचे बान्सी (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील टिपरे कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून शिरूर परिसरात वीटभट्टीवर कामाला होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास अंजलीसह सर्व कुटुंबीय वीटभट्टीवर कामाला गेले. सकाळी साडेनऊच्या सुमारास घरी जाऊन तीने सर्वांसाठी चहा करून आणला व ती परत घरी गेली. दरम्यान, राजू टिपरे यांची नऊ वर्षीय मुलगी थोड्याच वेळात वीटभट्टीवर वडिलांकडे रडत आली व तीने सांगितले की अंजली दिदीने घराचे दार लावून घेतले असून, ती दार उघडत नाही. त्यामुळे सर्वांनी घराकडे धाव घेतली. अंजली ला आवाज देऊनही तीने दार न उघडल्याने राजू टिपरे यांनी धक्का देऊन दार उघडले असता घरातील छताच्या लाकडी तुळईला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत अंजली आढळून आली. आसपासच्या लोकांच्या मदतीने त्यांनी अंजलीला शिरूर च्या ग्रामीण रूग्णालयात नेले, परंतु तेथील डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT