पुणे

शिरूरच्या बाजारात फळांची रेलचेल

CD

शिरूर, ता. २८ : वाढत्या उन्हाळ्याबरोबरच रमजान महिन्यातील रोजामुळे (उपवास) बाजारात गोड, रसाळ फळांची रेलचेल वाढली आहे. गावरान फळांबरोबरच परराज्यांतील आणि काही परदेशांतील फळांचीही आवक अधिक होऊ लागली आहे.
शिरूर शहरात पथारी लावून किंवा हातगाडीवरून फळांची विक्री करणारे सुमारे दोनशे छोटे-मोठे विक्रेते असून ते पुणे, वाशी, मुंबई व नगर येथील घाऊक बाजारातून फळे आणून किंवा येथील ठोक विक्रेत्यांकडून घेऊन फळांची विक्री करतात. तालुक्यातील निमोणे, निर्वी, गुनाट, चिंचणी शेजारील श्रीगोंदे तालुक्यातील हिंगणी, पिंपरी कोलंदर, राजापूर तसेच पारनेर तालुक्यातील कुरुंद, जवळे, निघोज येथील शेतकरीही शिरूरच्या बाजारात फळे विक्रीसाठी येतात किंवा येथील छोट्या फळविक्रेत्यांना फळांची घाऊक दराने विक्री करतात. शिरूर तालुका आणि शेजारच्या तालुक्यांतून फळांची टंचाई जाणवल्यास नेवासा, जळगाव, रावेर येथून केळी, मुंबईच्या वाशी मार्केटमधून कलिंगड आणि इतर फळे विक्रीसाठी आणतात.
येथील बाजार केळी, द्राक्षे, पेरू, संत्रा, मोसंबी, चिकू, सफरचंद, डाळिंब या फळांनी बहरला असून, शहरातील बसस्थानक परिसर, पाबळ फाटा, पाच कंदील चौक, निर्माण प्लाझा, बोरा कॉलेजजवळील परिसरात अनेक छोटे-मोठे फळांचे स्टॉल लागले आहेत. उन्हाळ्याची काहिली शमविण्यासाठी द्राक्षे, संत्रा या फळांना विशेष मागणी असून, रमजान महिन्यातील रोजा सोडतानाही फळांनाच मान असून पाणीदार फळ म्हणून कलिंगडाला विशेष मागणी आहे. रमजान महिन्याचे नियोजन म्हणून अनेक विक्रेत्यांनी कलिंगड, खरबूज, पपई फळे अधिक प्रमाणात विक्रीसाठी आणली आहेत. कुरुंद, चिंचणी या परिसरात घोड नदीकिनारी कलिंगड शेती करणारे अनेक शेतकरी असून, त्यांच्या शेतातून या फळांची खरेदी केली जाते. उन्हामुळे शहाळ्यांनाही पसंती दिली जात असून, सर्वच फळांची मागणी वाढल्याने भावदेखील काही प्रमाणात वधारले आहेत.

कलिंगडाने गाठली शंभरी
उन्हाळा आणि रमजान महिन्यातील उपवासामुळे फळांचे भाव वधारले असून, शंभर रुपये किलो असलेल्या संत्र्याचा भाव सव्वाशे ते दीडशेच्या घरात गेला आहे. कलिंगड, खरबूज, चिकू या फळांना अधिक मागणी आहे. साठ-सत्तर रुपयांपर्यंत मिळणारे कलिंगडाच्या भावाने शंभरी गाठली आहे. पन्नास रुपये डझनच्या केळीचा भाव साठ-सत्तर रुपयांवर गेला आहे. शंभर ते दीडशे रुपये किलो असा सफरचंदाचा भाव होता तो आता दोनशेहून अधिक झाला आहे. त्यातही आंबट-गोड चवीचे सिमला, इराण येथील सफरचंद तर आणखी भाव खात आहे.

परदेशातील फळांची उपलब्धता अधिक
गावरान फळांबरोबरच कोकणातून आंबे, अननस, काश्मीर व हिमाचल प्रदेशातून सफरचंद, कर्नाटकातून पेर, ड्रॅगन फ्रूट, तैवानची पपई आणि परदेशांतून दक्षिण आफ्रिकेतील संत्री, वॉशिंग्टनचे सफरचंद, चायनीज किवी, थायलंडची चिंच देखील शिरूरच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. केळी आणि पेरू या पारंपरिक फळांनाच पूर्वी अधिक मागणी असायची. परंतु आता अनेक प्रकारची फळे उपलब्ध झाल्याने ती देखील आवर्जून खरेदी केली जातानाचे चित्र आहे.

शिरूर शहरातील बाजारपेठ ही शिरुरसह पारनेर व श्रीगोंदे अशा तीन तालुक्यांची असल्याने त्या परिसरातूनही फळखरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. त्यादृष्टीने उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात फळविक्रीचे नियोजन करावे लागते. फळे टिकवून ठेवण्याचा अद्ययावत प्रकल्प शासनाने उभारावा व त्यात स्थानिक विक्रेत्यांची फळे टिकवून ठेवण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून द्यावी.
हाजी कदीर बागवान, घाऊक फळविक्रेते

हंगामानुसार फळांची विक्री करताना, उन्हाळ्यात फळांची मागणी वाढते. मुस्लिम बांधवात उपवास सोडताना फळांचे महत्त्व असल्यानेही मागणी वाढून भावदेखील वधारतो. त्यामुळे चार पैसे अधिकचे मिळतात. मात्र, नाशवंत मालामुळे अनेकदा तोटा देखील
सहन करावा लागतो.
सिद्धांत चव्हाण, फळविक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhor Minor Assault Case : पुणे चिमुकली अत्याचारात धक्कादायक बाब उघड, फॉरेन्सिक पथक दाखल; गोठ्यात नेऊन बलात्कार, आरोपी जेलची हवा भोगलेला

Tuljapur Robbery Case : काळजाचा थरकाप! भाड्याच्या बहाण्याने बोलावले अन् 4 तास केली अमानुष मारहाण; पंढरपूरच्या चालकाला तुळजापुरात लुटले

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन म्हसळा रोडवर पिक अप आणि ट्रेलरचा अपघात

Gold Rate Today: उच्चांकावरून सोनं 30 हजारांनी स्वस्त! मे महिन्यात मोठी घसरण; आजचा 1 तोळा भाव किती?

‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 11.35 कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT