पुणे

चाकूचा धाक दाखवून महिलांचे दागिने लुटले

CD

शिरूर, ता. ४ : रस्त्याच्या कडेला मोटार थांबवून विश्रांती करीत असलेल्या मोटारीतील महिलेला दोघांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील रिंगा, असे सुमारे ९१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेले. पुणे- नगर रस्त्यावर बोऱ्हाडे मळ्याजवळील (ता. शिरूर) कल्याणी हॉटेलसमोर शुक्रवारी (ता. ४) पहाटे साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला.
सुलोचना दुधाराम राठोड (रा. उत्तर वडोना, ता. नेर, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना राठोड या आपला चुलत भाऊ याच्या मोटारीतून (क्र. एमएच ३७ एडी ८९०७) मूळ गावी जात असताना त्याला झोप येऊ लागल्याने विश्रांतीसाठी म्हणून त्यांनी हॉटेल कल्याणी समोरील मोकळ्या जागेत मोटार उभी केली. ते मोटारीतच बसून विश्रांती घेत असताना पहाटे साडेचारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आवाज देऊन मोटारीचा दरवाजा उघडायला लावला. त्यापैकी एकाने चाकूचा धाक दाखवून सुलोचना यांच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र व कानातील रिंगा, असे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून ते पळून गेले.
या प्रकाराने घाबरलेल्या राठोड यांनी भावासह शिरूर पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हनुमंत नकाते करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा?

Navi Mumbai: नवी मुंबईत खासगी शाळांची मनमानी! मैदानांवर विनापरवानगी टर्फ उभारण्याच्या प्रकारात वाढ; पालिकेकडे कारवाईची मागणी

दुहेरी हत्याकांडाने पालघर हादरलं! आधी प्रेयसीसह आईवर हल्ला, नंतर तरुणाचा स्वत:वरही वार, थरारक कृत्याचं संतापजनक कारण समोर

MI vs SRH Live: रोहित शर्मा आजचाच नव्हे, तर आणखी काही सामने मुकणार; हार्दिक पांड्याने दिले अपडेट्स, मुंबई इंडियन्सच्या संघात ३ बदल

Cigarette Rate Hike: धूम्रपान करणाऱ्यांना मोठा झटका! सिगारेट तब्बल 17% नी महागणार; एका पाकिटामागे किती शुल्क आकारणार?

SCROLL FOR NEXT