पुणे

शिरूरमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यानमाला

CD

शिरूर, ता. ७ : येथील राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले आणि विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने, शुक्रवार (ता. ११) पासून तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेबरोबरच उत्सव समिती व नगरपरिषदेच्या वतीने रविवारी (ता. १३) राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन केले आहे.
शुक्रवारी ज्येष्ठ विचारवंत डॉ. विनोद बाबर यांचे ‘जीवन कसे जगावे’, या विषयावर, शनिवारी (ता. १२) शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे ‘समाज जीवनातील महापुरुषांचे ऋण’ या विषयावर तर रविवारी (ता. १३) प्रा. वसंत हंकारे यांचे ‘आई - वडील समजून घेताना’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. येथील बसस्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात रोज सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष, माजी नगरसेवक विनोद भालेराव यांनी दिली. या व्याख्यानमालेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
रविवारी सकाळी बसस्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेसाठी छत्रपती संभाजी महाराजांचे साहित्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार व आजची आधुनिक विचारसरणी आणि महात्मा फुलेंचे शैक्षणिक विचार व आजची शैक्षणिक धोरणे हे विषय देण्यात आले असून, विजेत्यांना आणि गुणवंतांना रोख बक्षिसांसह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. पहिली ते दहावी व अकरावी, बारावीसह सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी असे दोन गट या स्पर्धेसाठी असून, प्रत्येक गटांतून तीन गुणवंतांची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेतील सहभागासाठी येत्या शनिवारपर्यंत (ता. १२) प्रा. सुदाम वीर (संपर्क ९८५०५४५१७१), प्रा. रतनकुमार ससाणे (९९७०७४७३०९) यांच्याकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सोमवारी (ता. १४) सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन त्यानंतर अभिवादन सभा, दुपारी एक वाजता सांस्कृतिक कार्यक्रम तर सायंकाळी पाच वाजता बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्यापासून डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाणार असल्याचे, समितीचे सचिव प्रमोद गायकवाड यांनी सांगितले. पुढील शनिवारी (ता. १९) युवा गायक व संगीतकार राहुल साठे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT