शिरूर, ता. १० : येथील हुतात्मा स्तंभाजवळून जाणाऱ्या मार्गावर ‘समाजसेवी डॉ. बाळासाहेब नरवडे मार्ग’ या नवीन फलकाचे अनावरण झाले. यावेळी उपस्थितांपैकी अनेकांनी डॉ. नरवडे यांच्या वैद्यकीय व सामाजिक कार्याला उजाळा दिला.
शिरूर शहरातील पहिले दंतचिकित्सक व गोरगरिबांचे डॉक्टर, अशी ओळख असलेल्या स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे यांचे हुतात्मा स्तंभानजीक वास्तव्य होते. आजही त्यांचे हवेलीवजा घर त्याठिकाणी आहे. अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींचे त्यांच्याकडे येणे- जाणे असे. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मंत्री स्व. बापूसाहेब थिटे यांच्यासह अनेकांनी त्यांच्या घराला आवर्जून भेट दिली होती. डॉ. नरवडे यांच्या निधनानंतर हुतात्मा स्तंभाजवळून जाणाऱ्या रस्त्याला ३० वर्षांपूर्वी त्यांचे नाव देण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत तो समारंभ झाला होता. त्यावेळी लावण्यात आलेला फलक जीर्ण झाल्याने तो नुकताच बदलण्यात आला. या नवीन फलकाचे अनावरण शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, शिरूर खरेदी- विक्री संघाचे माजी अध्यक्ष शरद कालेवार, श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील जाधव, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष एजाज बागवान, आमदाबादचे माजी सरपंच योगेश थोरात, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, मयूर नहार, तुकाराम खोले, शुभम शहाणे, पंकज जाधव, परेश काळे, राहुल भोते, किरण काळे, अजित ठोंबरे, अस्लम शेख आदी उपस्थित होते. डॉ. नरवडे यांचे नातू व युवा नेते सागर नरवडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर यशराज नरवडे यांनी आभार मानले.
SUR25B0495८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.