शिरूर, ता. २७ : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील पाटील इनाम कचरा डेपोलगत शेतात मंगळवारी (ता. २७) सकाळी एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. बिबट्यांच्या आपापसांतील झुंजीत या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनखात्यातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.
रांजणगाव येथील अनिल पाचुंदकर व केशव रोकडे हे सकाळी साडेअकराच्या सुमारास शेताकडे गेले असता शेतात बिबट्या निपचित पडल्याचे दिसल्याने त्यांनी तातडीने याबाबत वनखात्याला कळविले. याबाबतची माहिती मिळताच शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, वनरक्षक वंदना चव्हाण, वनपाल बी. एस. शिंदे, वनरक्षक एस. ए. चव्हाण यांनी रेस्क्यू पथकाचे सदस्य जयेश टेमकर, शेरखान शेख, गणेश टिळेकर व अमोल कुसाळकर यांच्यासमवेत घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृत बिबट्याला शिरूर येथे वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात आणून शवविच्छेदन करण्यात आले व त्यानंतर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत बिबट्या पूर्ण वाढ झालेला नर जातीचा होता. हद्दीचे संरक्षण किंवा आपल्या अधिकारक्षेत्रात इतर नर बिबट्याने अतिक्रमण केल्याच्या वादातून आपापसांत झुंज होऊन या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.