पुणे

रांजणगाव हत्याकांड तपासासाठी विशेष पथक

CD

शिरूर, ता. ३१ : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाला सहा दिवस उलटूनही मृत महिलेसह मुलांची ओळख न पटल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल हे स्वतः ‘फिल्ड’वर उतरले असून, त्यांनी शनिवारी (ता. ३१) दुसऱ्यांदा रांजणगाव परिसराला भेट देत या प्रकरणाचा आढावा घेताना तपासासाठी विशेष पथक नेमण्याची घोषणा केली. या तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा लवकरच उलगडा करण्यात पोलिस दलाला यश येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रांजणगाव गणपती हद्दीतील खंडाळे माथा परिसरात एका बंद पडलेल्या कंपनीच्या मागील बाजूस गेल्या रविवारी (ता. २५) २५ ते तीस वयोगटातील महिला आणि दीड व चार वर्षे वयाच्या दोन मुलांचे मृतदेह आढळू आले होते. खून करून, पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न हल्लेखोराने केला होता. मात्र, पावसामुळे मृतदेह अर्धवट जळाले आणि हे तिहेरी हत्याकांड उघडकीस आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली हो,ती तर एकाच वेळी तीन खून झाल्याने घबराटही पसरली होती. हे तीनही मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाल्याने त्यांची ओळख पटविणे हेच पोलिसांपुढील मोठे आव्हान होते. त्यादृष्टीने पोलिसांनी परिसरातील भाडेकरूंची माहिती घेण्याबरोबरच जिल्हा व राज्याच्या विविध भागातील पोलिस ठाण्यांशी समन्वय साधून बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरवात केली होती. दरम्यान, शवविच्छेदनानंतर तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी हे मृतदेह ससूनला हलविण्यात आले होते. तेथे पाहणी व तपासणीनंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिली.
या तिहेरी हत्याकांड प्रकरणी नऊ पथके कार्यरत असताना आता विशेष पथक नेमण्यात आल्याचे गिल यांनी स्पष्ट केले. परिसरातील सीसीटीव्ही तपासणीबरोबरच तांत्रिक तपासावर भर देत ही टीम कार्यरत झाल्याचे त्यांनी सांगितले. मृतदेहांचे फोटो राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना पाठविले असून, समाजमाध्यमांवर प्रसारीत केले असल्याची माहिती गिल यांनी दिली. विविध सामाजिक घटकांशी संपर्क साधूनही माहिती घेतली जात असून, मृतांची ओळख पटल्यानंतर खुनी शोधणे सोपे जाईल व लवकरच आम्हाला या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात यश येईल, असे ते म्हणाले.
या हत्याकांड प्रकरणातील मृत महिलेच्या डाव्या हातावर ‘जय भीम’ असे गोंदलेले असून, बदामामध्ये ‘मॉम- डॅड’ असे इंग्रजीत लिहिले आहे. दुसऱ्या हातावरही रंगीत टॅटू काढलेले असून, बदामामध्ये इंग्रजीत ‘आर’ व ‘एस’ ही अक्षरे गोंदवली आहेत. या खुनाबरोबरच बेपत्ता व्यक्तींविषयी माहिती असल्यास रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याशी (दूरध्वनी क्र. ०२१३८ : २३२१३९) किंवा या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे (मोबाईल क्रमांक : ९४२०७५६७८२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाबाबत माहिती देणारांस पोलिसांनी रोख बक्षीसही जाहिर केले आहे. संबंधिताचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ओळख पटविणे कठीण
शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखालील या तिहेरी हत्याकांडाच्या तपासादरम्यान राज्याच्या विविध भागातील तब्बल दहा हजार मिसिंग केस पोलिसांनी तपासल्या. यातून महिलेसह दोन मुले बेपत्ता असल्याची तीन प्रकरणे पोलिसांच्या हाती लागली होती. त्यामुळे पोलिसांचा जीव भांड्यात पडला होता. कारेगावसह (ता. शिरूर) नारायणगाव आणि हिंगोली येथे अशा प्रकारे महिला व मुले बेपत्ता झाली होती. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांना बोलावून मृतदेह दाखविले. मात्र, मृतदेह जळालेले असल्याने ओळख पटविणे कठीण गेले. त्यातच अधिक तपास चालू असतानाच या तीनही ठिकाणच्या बेपत्तांचा शोध लागल्याने व ते सुखरूप असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांच्या तपासाने आता पुन्हा वेग घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT