पुणे

शिरूर परिसरात पाच दिवसांत नऊजण बेपत्ता

CD

शिरूर, ता. ३ : शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांतून गेल्या काही दिवसांत व्यक्ती, मुली व लहान मुलांसह महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, गेल्या पाच दिवसांत नऊ व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून विविध वयोगटांतील व्यक्ती बेपत्ता झालेल्या आहेत.
शिरूर शहरातील प्रीतम प्रकाश नगर येथून गेल्या बुधवारी एक महिला आपल्या दोन मुलांसह बेपत्ता झाली. मोनिका अक्षय नेहरकर (वय २५) असे त्यांचे, तर अण्विका (वय साडेचार वर्षे) असे मुलीचे आणि अण्विक (वय दीड वर्षे) असे मुलाचे नाव आहे. अक्षय प्रकाश नेहरकर (रा. प्रीतम प्रकाश नगर, शिरूर) यांनी याबाबत कळविल्यानंतर शिरूर पोलिसांनी आईसह मुले बेपत्ता झाल्याची नोंद घेतली. पुढील तपास पोलिस हवालदार उमेश भगत (मोबाईल क्र. ७३८७६४६६५१) करीत आहेत.
निर्वी (ता. शिरूर) येथील जगदिश एकनाथ आखुटे (वय २९) हे न्हावरे (ता. शिरूर) येथे कामाला जातो, असे सांगून आपल्या पॅशन प्रो या दुचाकीवरून (क्र. एमएच १२ जेवाय ३८२०) निघून गेले. बुधवारी (ता. ३० जुलै) सकाळी दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडलेले जगदीश अद्याप परतून न आल्याने व कामाच्या ठिकाणीही न पोचल्याने त्यांचे बंधू सागर एकनाथ आखुटे यांनी शिरूर पोलिसांकडे धाव घेत काल तक्रार नोंदवली. सडपातळ बांधा, काळासावळा वर्ण, दाढी राखलेली, मोठे केस असे सर्वसाधारण वर्णन असलेल्या जगदीश यांची उंची पाच फूट एक इंच आहे. घरातून बाहेर पडतेवेळी त्यांच्या अंगात राखाडी रंगाचा अर्ध्या बाह्यांचा टी शर्ट व काळी पॅंट आणि पायात काळ्या रंगाची स्लीपर होती. याबाबत शिरूर पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद घेतली असून, पुढील तपास पोलिस नाईक प्रताप टेंगले (मोबाईल क्र. ९८३४५०१२४०) करीत आहेत.
कैलास धोंडिभाऊ गाजरे (रा. गाजरे झाप, जांबुत, ता. शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे बंधू यशवंत धोंडिभाऊ गाजरे (वय ४०) हे शुक्रवारी (ता. १) सकाळी आठच्या सुमारास नाशिक येथील पारधी प्रा. लि. या खासगी कंपनीत कामासाठी म्हणून गेले. परंतु तीन दिवस उलटूनही ते कंपनीतही पोचले नाहीत किंवा परतून घरीही आलेले नाहीत. बेपत्ता यशवंत गाजरे यांची उंची साडेचार फूट असून वर्ण सावळा आहे. काळे केस, बारीक मिशी, बारीक दाढी असे त्यांचे सर्वसाधारण वर्णन असून, त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ, तर उजव्या हातात काळा धागा बांधलेला आहे. घरातून बाहेर पडतेवेळी त्यांनी राखाडी रंगाचा टी शर्ट व काळी पॅंट घातली होती. यशवंत गाजरे यांचा शोध लागत नसल्याने त्यांच्या बंधूने ते हरविले असल्याची तक्रार दिली असून, पुढील तपास पोलिस हवालदार अरुण उबाळे (९७६५४२०८९८) करीत आहेत.
मलठण (ता. शिरूर) येथे हॉटेल व्यवसाय करणाऱ्या रेखा चांगदेव भुजबळ यांची मुलगी स्नेहल चांगदेव भुजबळ (वय १९) ही गुरुवारी (ता. ३१ जुलै) सकाळी दहाच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर पडली. ती अद्याप परत न आल्याने रेखा भुजबळ यांनी शिरूर पोलिसांकडे खबर दिली. इयत्ता अकरावीत शिकणारी स्नेहल पाच फूट उंचीची असून, वर्ण गोरा आहे. घरातून बाहेर पडताना तीच्या अंगावर गुलाबी रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगिन्स होती. तीच्या उजव्या हाताच्या मनगटावर इंग्रजी ‘एस’ हे अक्षर गोंदलेले असून, या वर्णनाच्या मुलीबाबत माहिती समजल्यास या बेपत्ता प्रकरणाचा तपास करणारे पोलिस हवालदार एस. एन. वारे (९९६०६६६२३२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिरूर शहरापासून जवळच रामलिंग रस्त्यावरील शिवरत्न सोसायटी येथून पूजा मंगेश जौंजाळ (वय २६) या सम्यक या साडेतीन वर्षांच्या मुलासह बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचे पती मंगेश ताराचंद जौंजाळ यांनी शुक्रवारी (ता. १) याबाबत शिरूर पोलिसांना खबर दिली असून, पुढील तपास पोलिस हवालदार उमेश भगत करीत आहेत.
वडगाव रासाई (ता. शिरूर) येथून ऋतुजा दीपक चव्हाण (वय १८) ही मुलगी बुधवारी (ता. ३० जुलै) सकाळी ११ च्या सुमारास बेपत्ता झाली असून, तिचे वडील दीपक बबन चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवरून शिरूर पोलिसांनी बेपत्ता नोंद केली आहे. पाच फूट तीन इंच उंची, सडपातळ बांधा आणि सावळ्या वर्णाची ऋतुजा १२ वीत शिकत असून, तिचे वडील बॅंकेतील कामासाठी गेले असताना ती घरातून बेपत्ता झाली. पोलिस हवालदार अनिल आगलावे (मोबाईल क्र. ८२०८७५१५१६) पुढील तपास करीत आहेत.

किरकोळ कारणास्तव रुसून, छोट्याशा कारणावरून झालेल्या वादावादीमुळे किंवा नाराजीतून, विमनस्क स्थितीतून आणि मानसिक स्थिती अस्थिर झाल्यामुळे किंवा काही अमिषांमुळेही महिला, मुली किंवा काही व्यक्ती रागाने निघून जातात. काहींना फूस लावूनही
पळवून नेले जाऊ शकते. मानसिक तणावात असलेल्या, चिंताक्रांत व्यक्तींना एकटे सोडू नये. त्यांच्याशी सुसंवाद साधावा. शक्य असल्यास त्यांचे समुपदेशन करावे.
- संदेश केंजळे, पोलिस निरीक्षक, शिरूर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झोपलेले गृहमंत्री जागे होतील अशी अपेक्षा, रोहित पवारांनी व्यक्त केला संताप; मध्यरात्री ३ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात

ENG vs IND: जो रुट भारतासाठी ठरलाय डोकेदुखी! ३९ वे कसोटी शतक ठोकत केलेत कोणालाच न जमलेले पराक्रम

Mahadevi Elephant : माधुरी हत्तीण कोल्हापूरला परत मिळणार का? कोणत्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार? वाचा...

धक्कादायक! 'साेलापुरमध्ये तरुणाने व्हिडिओ पाठवून जीवन संपवले'; दोनच महिन्यापूर्वी विवाह, भलतचं कारण आलं समाेर..

पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण, शिवीगाळ; गुन्हा नोंदवता येणार नाही, पोलिसांचं पत्र

SCROLL FOR NEXT