शिरूर, ता. ३१ : मुंबईतील हजारो समाजबांधवांसाठी रविवारी (ता.३१) शिरूर शहर व परिसरातून दोन टेम्पो भरून खाद्यपदार्थ व एक टेम्पो भरून पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स पाठविण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील समाजबांधवांसाठी ''एक घर एक शिदोरी'' अशा पद्धतीने केलेल्या अनोख्या आवाहनाला शहर व पंचक्रोशीतील नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकल मराठा समाज संघ, श्रीराम सेना, सह्याद्री प्रतिष्ठान, शिरूर शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समिती, मराठा महासंघ यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत पाच हजार भाकरी, दोन बॉक्स भरतील एवढी चटणी, लोणचे, ठेचा व इतर खाद्यपदार्थ जमा झाले. अनेकांनी रोख स्वरूपात दिलेल्या देणगीतून चारशे किलो फरसाण, शंभर किलो लाडू, सात हजार बिस्कीट पुडे, उपवासाचा चिवडा व इतर खाद्यपदार्थ तीन टेम्पोतून मुंबईच्या दिशेने पाठविण्यात आले. श्रीराम सेनेचे संस्थापक सुनील जाधव, सूरज पाचंगे, संभाजी कर्डिले, वैशाली गायकवाड, खुशाल गाडे, कृणाल काळे, संपत दसगुडे, सागर नरवडे, अक्षय जाधव, सिद्धान्त चव्हाण, स्वप्नील रेड्डी, मध्यकांत पानसरे, गणेश घाडगे, रमेश दसगुडे, प्रदीप वाखारे, राहुल गिरमकर, योगेश महाजन, यश धन्नी, सुनील इंदुलकर, योगेश कदम, जयवंत साळुंके, सागर ओव्हाळ आदींनी पुढाकार घेतला. शरद कालेवार, संदीप वर्पे, तुषार भदाणे, अप्पासाहेब वर्पे, प्रवीण घावटे, अरविंद घावटे, शिवाजी दसगुडे यांनी विशेष सहकार्य केले.
दरम्यान, खाद्यपदार्थ विक्रेते तन्वीर शेख यांनी शंभर पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स दिले तर अनेक मुस्लिम भगिनींनी भाजी - भाकरीची शिदोरी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.