पुणे

शिरूरमध्ये धारिवाल परिवाराकडून मिठाई वाटप

CD

शिरूर, ता. २१ : येथील धारिवाल परिवाराकडून दिवाळीनिमित्त शहरातील विविध भागात मिठाईचे वाटप करण्यात आले. शहर व परिसरातील सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांना धारिवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी घरोघर जाऊन मिठाईचे पुडे देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
दिवाळीचा सण साजरा करत असताना आपल्या परिसरातील गोरगरीब बांधवांची, वंचित घटकांचीही दिवाळी गोड व्हावी या हेतूने धारिवाल कुटुंबीयांनी ५० वर्षांपूर्वी मिठाई वाटपाचा हा उपक्रम सुरू केला. माजी नगराध्यक्ष (स्व.) माणिकचंद धारिवाल यांनी सुरू केलेला हा उपक्रम त्यांचे चिरंजीव व उद्योगपती (स्व.) रसिकलाल धारिवाल यांनी पुढे चालविताना त्याला व्यापक स्वरूप दिले. त्यांची ही परंपरा त्यांचे पूत्र व शिरूर नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल हे चालवीत असून, आता युवा नेते आदित्य धारिवाल हे देखील गेल्या काही वर्षांपासून या उपक्रमात थेट सहभाग घेतात.
प्रकाश धारिवाल व आदित्य धारिवाल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील शांतिनगर, सिद्धार्थनगर, इंदिरा नगर, सय्यदबाबा नगर, बी. सी. हाउसिंग सोसायटी, हल्दी मोहल्ला, मदारी मोहल्ला या परिसरात फिरून नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, घरोघर मिठाईचे बॉक्स देऊन तोंड गोड केले, अशी माहिती श्री शिवसेवा मंडळ ट्रस्टचे विश्वस्त मनसुखलाल गुगळे यांनी दिली.
मिठाई वाटपप्रसंगी शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, युवा नेते किरण पठारे पाटील, उद्योजक प्रशांत शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय देशमुख, शिरूर कुंभार समाजाचे अध्यक्ष योगेश जामदार, खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी असिफ शेख, विनोद धाडिवाल, प्रवीण दसगुडे, सुभाष गांधी, सुनील बोरा, अभिजित पाचर्णे, दादाभाऊ वाखारे, आबिद शेख, सचिन धाडिवाल, पैलवान अशोक पवार, हाफीज बागवान संतोष थेऊरकर, अविनाश घोगरे, संतोष शितोळे, अमोल चव्हाण, नीलेश पवार, सागर नरवडे, आशिष शिंदे, विशाल जोगदंड, दादाभाऊ लोखंडे, अमजद पठाण, तुषार जांभळे, मितेश गादिया आदी उपस्थित होते.

05777

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT