पुणे

गोलेगावात आढळला १२ फुटी अजगर

CD

शिरूर, ता. २६ : गोलेगाव (ता. शिरूर) जवळील महाजनमळा परिसरात मंगळवारी (ता. २५) सकाळी सुमारे १० ते १२ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने खळबळ उडाली. एक अखंड शेळी गिळालेल्या या अजगराला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिल्यानंतर रात्री उशिरा त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्यात आले.
गोलेगावनजीक महाजनमळा परिसरातील पाचर्णे वस्तीजवळील कुरणात ज्येष्ठ महिला आपल्या शेळ्यांना चरण्यासाठी घेऊन गेली असता एक शेळी गर्द झाडीत गेली. त्यावेळी शेळीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने पशुपालक महिलेने धाव घेतली असता अजगराने शेळीला पूर्णपणे लपेटून पिळवटल्याचे दिसून आले. दरम्यान, हे दृश्य बघून घाबरलेल्या महिलेने वस्तीकडे धाव घेत काही तरुणांना मदतीसाठी बोलाविले. तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा गर्द झुडपात, शेळीला पूर्णपणे गिळून अजगर निवांतपणे पहूडल्याचे दिसले. मात्र, शेळीला वाचविण्याच्या उद्देशाने तरुण जवळ जाताच तो आक्रमक झाला आणि फुत्कार टाकू लागला. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने व तरुणांनी शिरूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना कळविले. वनरक्षक गणेश झिरपे यांच्यासह रेस्क्यू पथकाचे संदीप गव्हाणे, श्रीकांत भाडळे, मंगेश ओव्हाळ, गिरीश कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत संदीप वाखारे व स्थानिक तरुणांच्या मदतीने अजगराला ताब्यात घेण्याचा व शेळीला वाचविण्याचा प्रयत्न केला असता, आक्रमक अजगराने गिळालेली शेळी तोंडातून बाहेर फेकली. मात्र, अजगराच्या पोटात गुदमरल्याने शेळी मृत्यू झाला.

चाळीस किलो वजनाचा अजगर
या अजगराला वनखात्याच्या शिरूर येथील कार्यालयात आणून प्राथमिक तपासणी केली. चाळीस किलो वजनाचा, पूर्ण वाढ झालेला हा अजगर दहा ते बारा फूट लांबीचा होता. अंतर्बाह्य कुठल्याही जखमा झालेल्या नसल्याने रात्री उशिरा त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गव्हाणे यांनी दिली.


05860

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: इराणने युद्धाचे नियमच बदलले! F-25, F-22 जेट्स अन् शक्तिशाली मिसाईल्सला तोंड देणारं तंत्रज्ञान पहिल्यांदाच जगासमोर

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडर टंचाईचा परिणाम; इंडक्शन शेगड्यांची दुपटी किमतीने विक्री, कोळसा व डिझेल शेगड्यांनाही वाढती मागणी

Pune Fire : शनिवारवाड्याजवळ पालापाचोळ्याला आग; नारायण दरवाजाला आगीची झळ

Pune News : पथारी शुल्कात ७५ टक्के कपात करा; स्थायी समितीपुढे ठराव

Gas Cylinder Shortage : कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा

SCROLL FOR NEXT