पुणे

शिरूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का

CD

शिरूर, ता. १६ : शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक सत्तास्थापनेदरम्यान एकत्र आले. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत या आघाडीचे मितेश प्रदीप गादिया यांनी बाजी मारली. ११ जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या नितीन मच्छिंद्र पाचर्णे यांचा त्यांनी पराभव केला.
शिरूर नगर परिषदेच्या निवडणूकीत ११ जागा मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सात, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले होते. त्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिल्याचे जाहिर केले होते. मात्र, त्या निकालापासून ते आजच्या उपनगराध्यक्षपद निवडीपर्यंतच्या कालखंडात पुलाखालून बरेच पाणी गेले. त्यामुळे उपनगराध्यक्षपदी निवडीवेळी कुठली समीकरणे जुळणार, याकडे राजकीय निरीक्षकांसह शिरूरकर नागरिकांचे लक्ष लागले होते.
उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगर परिषदेच्या (स्व.) रसिकभाऊ धारिवाल सभागृहात नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची पहिली सभा झाली. उपनगराध्यक्षपदासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मितेश गादिया यांच्या बाजूने १४, तर भाजपचे नितीन पाचर्णे यांच्या बाजूने ११ नगरसेवकांनी हात वर करून पसंती दर्शवली. त्यानंतर नगराध्यक्ष पाचर्णे यांनी उपनगराध्यक्षपदी गादिया यांची निवड झाल्याचे घोषित केले. त्यांनी गादिया यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनीही त्यांचा सन्मान केला. मितेश गादिया यांचे वडील मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गादिया, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, मच्छिंद्र कटके, अमित गोते आदी यावेळी उपस्थित होते.
उपनगराध्यक्षपदी निवड झालेले गादिया हे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक आठमधून निवडून आले असून, शहर व परिसरातील विविध सामाजिक संघटनांशी त्यांचा संबंध आहे. विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो.

शिरूर नगरीच्या विकासात स्व. रसिकभाऊ धारिवाल यांच्यासह अनेकांचे योगदान आहे. तीच परंपरा पुढे चालविताना या नगरीच्या रचनात्मक विकासात योगदान देण्यासह सर्वसामान्य नागरीकांच्या समस्या सोडविण्याला माझे प्राधान्य राहिल. यापुढे सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी २४ तास झोकून देऊन काम करण्याचा मी प्रयत्न करीन. आमदार माउली कटके, माजी आमदार अशोक पवार व माझे मार्गदर्शक प्रकाश धारिवाल यांच्यामुळे मला ही संधी मिळाली असून, या संधीचे मी रचनात्मक व वैशिष्ट्यपूर्ण कामांतून सोने करीन.
- मितेश प्रदीप गादिया, उपनगराध्यक्ष, शिरूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : कल्याण मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT