पुणे

शिरूरमध्ये दोनच अर्ज दाखल

CD

शिरूर, ता. १९ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीला तीन दिवस उलटल्यानंतरही एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तीनच दिवसांचा कालावधी उरला असतानाही सोमवारी दिवसभरात पंचायत समिती निवडणुकीसाठी केवळ दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले; तर जिल्हा परिषदेसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
शिरूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात व पंचायत समितीच्या १४ जागांसाठी निवडणूक होत असून, जवळपास सर्वच गट व गणांत मोठी चुरस आहे. कुठल्याही पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नसताना अनेक गट- गणांत स्वयंघोषित नेत्यांनी उमेदवारी गृहित धरून गेल्या महिनाभरापासूनच प्रचाराची राळ उडवून दिली होती. शुक्रवारपासून (ता. १६) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली. मात्र, सुरवातीच्या दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. रविवारी सुटीचा दिवस उलटल्यानंतर सोमवारी चा दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवसांचा कालावधी उरला असल्याने उद्या (ता. २०) व बुधवारी (ता. २१) विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
शिरूर तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जात असून, जिल्हा परिषदेचे सात गट व पंचायत समितीच्या १४ गणांसाठी स्वतंत्र टेबलांची व्यवस्था केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करूनच सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करावेत व पुढे निवडणुकीला सामोरे जावे, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे. सोमवारअखेर १२० उमेदवारी अर्जांची विक्री झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT