पुणे

शिरूरच्या सभापतिपदी स्वाती घावटे, उपसभापतिपदी सासवडे

CD

शिरूर, ता. ९ : शिरूर पंचायत समितीच्या सभापतिपदी स्वाती विठ्ठल घावटे यांची; तर उपसभापतिपदी रामभाऊ बबनराव सासवडे यांची बिनविरोध निवड झाली. शिरूर पंचायत समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुमत असल्याने दोन्ही पदांवर पक्षाच्या सदस्यांची निवड झाली. राज्यपातळीवरील युतीधर्माचे पालन म्हणून व दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून भाजपने या पदाधिकारी निवडणुकीतून आपले उमेदवार मागे घेतल्याने सभापती- उपसभापतींच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
शिरूर पंचायत समितीच्या गेल्या महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १४ पैकी आठ जागा जिंकून राष्ट्रवादी कॉंग्रेसने बहुमत मिळविले होते. भाजपचे पाच, तर कोमल ढेरंगे या अपक्ष निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीच्या सहयोगी सदस्य म्हणून त्यांच्यासह नऊजणांच्या गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करण्यात आली होती. त्यामुळे सभापती- उपसभापतिपदांवर याच पक्षाच्या सदस्यांची निवड होईल, हे स्पष्ट होते. तथापि, शिरूर तालुका हा शिरूर व आंबेगाव या मतदार संघात विभागलेला असल्याने माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार माऊली कटके यांच्यातील समन्वयातून हे पद कुठल्या भागाला जाणार याबाबत उत्सुकता होती. तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते, माजी आमदार अशोक पवार यांच्या विचाराचे दोन सदस्य ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडून आलेले असल्याने त्यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले होते. मात्र, पक्षपातळीवर स्थानिक नेतेमंडळींची चर्चा होऊन सुरवातीला शिरूर भागाला सभापतिपद - उपसभापतिपद देण्याबाबतचा निर्णय झाला.
सोमवारी सकाळी पक्षनिरीक्षक म्हणून आलेले शरद बुट्टे पाटील यांनी आमदार माऊली आबा कटके व माजी आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या सर्व पंचायत समिती सदस्यांची मते जाणून घेतली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, शहराध्यक्ष शरद कालेवार, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे व प्रकाश पवार, पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब कोळपे, माजी उपसभापती राजेंद्र जासूद, शिरूर खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, उपाध्यक्ष बाळासाहेब नागवडे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी पक्षाकडून सभापतिपदी स्वाती घावटे व उपसभापतीपदासाठी रामभाऊ सासवडे यांची नावे निश्चीत झाली.
दरम्यान, सभापती- उपसभापती निवडीसाठी पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात निवडणुकीचे कामकाज घेण्यात आले. प्रांताधिकारी विठ्ठल जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून; तर गटविकास अधिकारी महेश डोके यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सभापतिपदासाठी स्वाती घावटे यांनी; तर भाजपकडून मनीषा सतीश पाचंगे यांनी, तसेच उपसभापतिपदासाठी रामभाऊ सासवडे यांच्यासह भाजपकडून सागर देवकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, शशिकांत दसगुडे, राजेंद्र जासूद यांनी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे यांच्यासह शेखर पाचुंदकर, राहुल गव्हाणे, सतीश पाचंगे आदी स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधून स्थानिक परिस्थितीची माहिती दिल्यानंतर त्यांनी सभापती - उपसभापती ही पदे बिनविरोध करण्याबाबत हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार मनीषा पाचंगे व सागर देवकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. माजी आमदार पोपटराव गावडे यांनीही या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावली. अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आणि युतीधर्माचे पालन म्हणून भाजप उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर सभापतिपदी स्वाती घावटे व उपसभापतिपदी रामभाऊ सासवडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जोशी यांनी जाहीर केले. राजेंद्र कोरेकर व रवीबापू काळे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. जिल्हा परिषद सदस्या वृषाली वाळके, माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, शिरूर ग्रामीणच्या सरपंच शिल्पा गायकवाड, माजी सरपंच अरुण घावटे, उपसरपंच सचिन घावटे, माजी उपसरपंच बाबाजी वर्पे व संजय शिंदे, अमोल वर्पे, राष्ट्रवादीचे पंचायत समितीतील गटनेते दीपक पवार - कोहकडे आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Massajog Election: मस्साजोगमध्ये अश्विनी देशमुख यांचा पराभव का झाला? 5 मोठी कारणं; धनंजय देशमुखांची खरंच 'ती' चूक होती?

Prakash Awade Dhairyashil Mane: आवाडे- धैर्यशिल माने संघर्ष पेटणार, प्रकाश आवाडेंच्या वक्तव्यानंतर, भावी आमदार म्हणून माने समर्थकांनी डिवचलं

स्टार प्रवाहवर नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, प्राजक्ता गायकवाडचं ५ वर्षानंतर कमबॅक, सोबतीला 'ही' अभिनेत्री

Budget Mobile : नवीन मोबाईल घ्या बजेटमध्ये! 20 हजारच्या आत टॉप 5G स्मार्टफोन्स; बेस्ट कॅमेरा, दमदार फीचर्स अन् बरंच काही

आमदारकीसाठी शिंदेंसोबत जाण्याइतका मी नालायक नाही, संधी दिली तर...; विधानपरिषद अन् विलीनीकरणावर बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT