पुणे

शिरूरमध्ये दोघांकडून गावठी पिस्तूल जप्त

CD

शिरूर, ता. ८ : दहशतवादविरोधी शाखेच्या (एटीबी) पथकाने बुधवारी (ता. ८) सकाळी साडेआठच्या सुमारास शिरूर शहरातील सतरा कमानीच्या पुलाजवळ दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले.
याबाबत दहशतवादविरोधी शाखेचे पोलिस अंमलदार ओंकार लालासाहेब शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुमीत वसंत शेळके (वय २०, रा. शेळके वस्ती, पळवे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) व साजिद रफीक खान (वय ३०, रा. मंगलमूर्ती नगर, शिरूर) यांच्याविरूद्ध बेकायदा अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दहशतवादविरोधी शाखेतील सहायक फौजदार एम. व्ही. गायकवाड व व्ही. एस. गव्हाणे, पोलिस हवालदार एन. बी. कदम, आर. आर. जाधव, एस. बी. शेख व जे. बी. मुळीक हे शिरूर परिसरात गस्त घालीत असताना सतरा कमानीच्या पुलाजवळ दोन तरुणांमध्ये गावठी पिस्तूल विक्रीचा बेकायदा व्यवहार होणार असल्याची माहिती समजली. त्यानुसार शिरूर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक शुभम चव्हाण, एन. टी. पिसाळ यांच्या मदतीने त्यांनी परिसरात सापळा लावला. सकाळी साडेआठच्या सुमारास सुमीत शेळके व साजिद शेख हे त्याठिकाणी संशयास्पदरित्या बोलताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस करताच दोघांनीही घटनास्थळाहून पळ काढला. पोलिस पथकाने पाठलाग करून त्यांना पकडले. त्यावेळी शेळके यांच्या कंबरेला पिस्तूल आढळून आले. ते पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत साजिद खान यानेच पिस्तूल दिल्याचे त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT