पुणे

शिरूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेसाठी ''सत्याग्रह''

CD

शिरूर, ता. १९ : शिरूर परिसरातील वाढती गुन्हेगारी आणि ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांचे तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन सहाव्या दिवशीही कायम आहे. सोमवारी प्रांताधिकारी विठ्ठल जोशी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन वाळूंज यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
जयहिंद सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश वाळूंज बुधवारपासून (ता. १५) या आंदोलनास बसले आहेत. शिरूर तालुका नशामुक्त करणे, अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र भरारी पथक नेमणे आणि पोलिसांच्या रिक्त जागा भरणे अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा वाढत असून, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे स्वीय सहायक दत्ता आवारी यांनीही वाळूंज यांची भेट घेतली.
दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनीही आंदोलकांशी संवाद साधला. मात्र, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वतः शिरूरमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी वेळ द्यावा, या मागणीवर वाळूंज ठाम आहेत. ठोस उपाययोजना होईपर्यंत सत्याग्रह सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"एकाच दिवसात आमचे दोन अपघात झाले" भाग्य दिले तू मला फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा प्रसंग

Latest Marathi News Live Update: नागपुरात 'मेड इन पाकिस्तान' असलेल्या कॉसमॅंटिक जप्त

BMC: वाकोला नाल्यावर जलवाहिनीसाठी पूल, महापालिकेचा तीन कोटी रुपयांचा आराखडा तयार

IPL 2026: श्रेयस अय्यरकडून 'गिफ्ट' साठी, प्रियांश आर्य व कूपर कॉनली यांनी LSG च्या गोलंदाजांना दिला चोप; काय होती अट?

IPL 2026 : सीधी बात नो बकवास! "MS Dhoni च्या फॅन्सने चापलूसी करणे सोडावे, तो आला तरी CSK च्या कामगिरीत फार फरक पडणार नाही"

SCROLL FOR NEXT