पुणे

‘महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना ट्रस्टमध्ये प्रतिनिधित्व द्या’

CD

शिरूर, ता. २३ : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील श्री महागणपती देवस्थानच्या परंपरेशी निगडीत असलेल्या करडे, निमगाव म्हाळुंगी, गणेगाव खालसा आणि ढोकसांगवी या गावांना देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी शिरूर तालुका मुद्रक संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबूराव कोंडीबा पाचंगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत त्यांनी श्री रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.
अ‍ॅड. पाचंगे यांनी निवेदनात म्हटले आहे की, देवस्थानच्या अधिकृत माहितीनुसार, महागणपतीच्या चार बहिणींची मंदिरे करडे, निमगाव, गणेगाव आणि ढोकसांगवी येथे असल्याचा उल्लेख आहे. देवस्थान ट्रस्टमध्ये पुणे जिल्ह्याचा प्रतिनिधी विश्वस्त नियुक्त करण्याची पद्धत आहे. त्याच धर्तीवर महागणपतीशी धार्मिक व पारंपरिक नाते असलेल्या या गावांमधून प्रत्येकी एक प्रतिनिधी विश्वस्त म्हणून नियुक्त करावा.
रांजणगावच्या महागणपतीशी या गावांचे धार्मिक नाते असून, देवस्थानच्या परंपरेत या गावांना विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सवाच्या काळात ''श्रीं''ची पालखी व द्वारयात्रा या चार गावांशी जोडलेली आहे. या यात्रेदरम्यान हजारो भाविक सहभागी होत असतात. भाविकांचे स्वागत, सेवा-सुविधा आणि यात्रेचे नियोजन यासाठी या चारही गावांतील ग्रामस्थ भक्तिभावाने योगदान देत असतात. या धार्मिक परंपरेचा विचार करता, या गावांना देवस्थानच्या निर्णयप्रक्रियेतही स्थान मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भविष्यात महागणपतीची पालखी द्वारयात्रा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडताना भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी गावनिहाय प्रतिनिधित्व उपयुक्त ठरेल, असा मुद्दा मांडण्यात आला आहे.
देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीच्या घटनेत आवश्यक बदल करून महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांमधून प्रत्येकी एक ग्रामस्थ प्रतिनिधी विश्वस्त म्हणून नियुक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा

LPG Gas Cylinder E-KYC: गॅस सिलिंडरची e-KYC केली का? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम; जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप माहिती

Nilanga Drought Crisis : आता जगायचं कसं ? मुख्यमंत्र्यांच्या समोर शेतकऱ्यांनी फोडला टाहो, CM फडणवीसांनी केलं असं काही..

Marathi News Live Updates : बदलापुरात बसची दुचाकीला धडक दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

Shrivardhan Fishermen Crisis : खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका श्रीवर्धन तालुक्यातील वल्हावरच्या लहान होड्या अद्यापही किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT