पुणे

सासवडला येत्या गुरुवारी ‘कोण होणार सभापती’

CD

सासवड, ता. ५ : सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक व पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कोण होणार सभापती’ या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन येत्या गुरुवारी (ता. १२) करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. खुल्या गटासाठी होणाऱ्या स्पर्धेत पुरंदर - हवेलीतील १८ वर्षांपुढील महाविद्यालयीन युवक-युवती, शेती, सहकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील व्यावसायिक तसेच कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. यासाठी ५० रुपये नाममात्र प्रवेश फी असून प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य राहील. मंगळवार (ता. १०) पर्यंत प्रवेश अर्ज करता येणार आहेत. सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात गुरुवारी (ता. १२) सकाळी १० वाजता ही स्पर्धा सुरू होणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव रवींद्रपंत जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
दरम्यान, गुरुवारी (ता.१२) सकाळी १० वाजता आमदार जगताप यांच्या हस्ते आणि ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्‌घाटन होणार आहे. तर याच दिवशी सायंकाळी स्पर्धा झाल्यावर बक्षीस वितरण होईल. स्पर्धेसाठी दोन फेऱ्या राहणार असून पहिल्या फेरीसाठी ५+२ मिनिटांचा अवधी राहील. त्यासाठी ‘पुरंदर काल, आज आणि उद्या’, ‘नोकरी की व्यवसाय’, ‘ऐतिहासिक वास्तू सुशोभीकरण की विद्रूपीकरण’, ‘वधू - वर अपेक्षा की समस्या’, ‘पारंपरिक सण की सणांचे पाश्चातिकरण’ आणि ‘आज शिवराय असते तर’ हे विषय राहणार आहेत.
तर दुसऱ्या फेरीसाठी ३ +२ मिनिटांचा अवधी असून पहिल्या १० स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे. त्यांना चिठ्ठीप्रमाणे ऐनवेळी विषयावर बोलावे लागणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ‘सभापती किताब’ व फिरता करंडक, प्रशस्तिपत्रक व रोख ७ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ दोन क्रमांकासाठी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार आणि १ हजार रोख, ट्रॉफी व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार असल्याचे रवींद्रपंत जगताप यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी ९४०५१५९४४९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT