पुणे

श्री हरेश्‍वर मंदिर परिसराचा होणार विकास

CD

सासवड, ता. ११ : पिंपळे वन विभागाच्या हद्दीतील (ता. पुरंदर) उंच डोंगरावर असलेल्या हरेश्वर मंदिर व परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी असलेल्या ५१७.६३ लाख रुपयांचा विकास आराखड्यास मान्यता मिळाल्याची माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली.

महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांची नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. या प्रस्तावातील क्षेत्र हे राखीव वन आहे. या क्षेत्रात पर्यटनाकरिता सुविधा निर्माण करण्याकरिता कामे करावयाची आहेत. तसेच हे क्षेत्र पुरंदरमधील महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र जेजुरीचा खंडेराया, सह्याद्री पर्वतावर यादवकालीन शिल्पकलेचा सुंदर नमुना असलेले भुलेश्वर मंदिर, शंभू महादेवाची सिद्धेश्वर, चांगावटेश्वर, संगमेश्वर, जवळार्जुन, पांडेश्वर या मंदिरानजीक आहे. तसेच धार्मिक वारसा असलेले श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर वीर, कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, बोपगाव येथील कानिफनाथ मंदिर, नारायणपूर येथील दत्त मंदिर, सासवड येथील संत सोपानदेव मंदिर. अशी धार्मिक स्थळे येथून जवळ असल्याने हजारो पर्यटन भाविक येथील येत असतात. याचप्रमाणे मौजे पिंपळे वन विभागाच्या हद्दीत उंच डोंगरावर असलेले श्री शंभू महादेवाच्या हरेश्वर मंदिर व परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी आमदार संजय जगताप यांनी प्रस्ताव दिला होता.
03384

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT