पुणे

सासवडला बांधकामावरील लोखंडी प्लेट चोरीला

CD

सासवड, ता. २२ ः येथील सासवड शहरातील सोनोरी रस्त्याच्या नजिक शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मागे व्यंकटेश नंदनवन या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. तिथे ए विंगमध्ये ठेवलेल्या सेंट्रीग कामाच्या लोखंडी एकूण ९० प्लेट किंमत ७२,००० रुपयांच्या अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या. याबाबत फिर्यादी रोहन राजेंद्र जगताप (वय ३०, व्यवसाय-सिव्हिल काॅन्टॅक्टर, रा. चव्हाण काॅर्नर, सुमन अंजली निवास, घर नं. ६५१, सासवड ता. पुरंदर) यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरुन चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना शुक्रवारी (ता. २१) रोजी पहाटे अडीच्या सुमारास घडली. चोरटा जरी अज्ञात असला, तरी ज्या वाहनातून या लोखंडी प्लेट चोरुन नेल्या. त्या वाहनाचा नंबर फिर्यादीने मिळवला आहे. या वाहनच म्हणजेच छोटा हत्ती टेम्पो नंबर (एम.एच. १२ जी.टी. ४०७१) असा आहे. या टेम्पोमधूनच दोन अज्ञात चोरट्यांनी प्लेट चोरुन नेल्या, अशी माहिती पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली.

..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT