पुणे

सासवडला बेकायदेशीर पार्किंगसह अतिक्रमणाचा विळखा

CD

सासवड, ता. २९ : गेली दोन वर्षे महामार्ग हद्दीतच विविध अतिक्रमणे, विक्रेते, हातगाड्या, बेकायदेशीर पार्किंग आदी प्रकारचे अतिक्रमण इतके वाढले की, वाहतुकीला त्यातून अडथळा येत आहे. इतकेच नव्हे तर चक्क महामार्गाच्या एका पूर्ण लेनवरच अगदी डांबरी रस्त्यावरच अतिक्रमणे होऊन रस्ता वाहतुकीस अपुरा पडल्याचा अनुभव दिवसेंदिवस येत आहे. यावर सासवड नगरपालिकेने कारवाई करणार असल्याचे सांगून तीन आठवडे लोटले तरी अतिक्रमणांवर कारवाई झालीच नाही. त्यात आता यात्रा, जत्रा हंगाम, लग्न सोहळे, उन्हाळी सुट्ट्यांमुळे रस्त्यावर व लगत बेकायदेशीर पार्किंगची वाहने वाढली आहेत. त्यातून वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
सासवड (ता. पुरंदर) हे शहर पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने येथे तालुक्यातील सर्व गावांचे रस्ते येऊन मिळतात. त्यामुळे शहरात वाहनांची संख्या अगणित वाढली असतानाच लग्नांचा व यात्रांचा हंगाम, सुट्ट्यांचे दिवस आल्याने ही वाहने वाढली आहेत. त्यातून सासवड व परिसरात महामार्गावर व लगत वाढणाऱ्या अतिक्रमणात बेकायदेशीर पार्क केलेल्या वाहनांमुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. उन्हाच्या कडाक्याने आता वाहतूक पोलिसही चुकून कधीमधी हजेरी लावतात. त्यामुळे बेकायदेशीर पार्किंग, खोळंबलेली वाहतूक, घडणारे अपघात, वाहतूक व्यवस्थापन यांचा पुरता बट्याबोळ झाला आहे.

सासवडला कुठेही फ्लेक्स, होर्डींगद्वारे विद्रूपीकरण होतेय. त्यात महामार्गावरील अतिक्रमण, अनधिकृत पार्किंगबाबत मी कितीतरी नगरपरिषद प्रशासनास पत्रे लिहिले. निष्काळजीने अपघातास नगर परिषद जबाबदार राहील, असेही बजाविले.’’
-डॉ. उदयकुमार जगताप, सामाजिक कार्यकर्ते, सासवड

‘‘मार्च महिन्यामध्ये अतिक्रमणांवरील सुरु केलेली कारवाई थांबली होती. परंतु, आता विलंब झाला असला तरी मे महिन्याच्या प्रारंभीच अतिक्रमणे व विक्रेते, बेकायदेशीर पार्किंग यावर कारवाई करणारी पथके आम्ही तयार करणार आहोत. पोलिस यंत्रणेलाही याबाबत पत्र देऊन सहकार्य घेतले जाईल.’’
-निखिल मोरे, मुख्याधिकारी, सासवड नगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Live Update : खरात प्रकरणी सर्व गुन्हे एसआयटीकडे वर्ग

बापरे! भारतात दिसला झोम्बी? पंजाबमध्ये या ठिकाणी नक्की घडतंय तरी काय? Viral Video

SCROLL FOR NEXT